Rajasthan Election : रात्री उशिरा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची 'वॉर रूम'मध्ये बैठक; काय घडले ? गेहलोत म्हणाले...

CM Ashok Gehlot News : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी थेट 'वॉर रूम'मध्येच रात्री बैठक घेतल्यामुळे त्याची मोठी चर्चा रंगली आहे.
CM Ashok Gehlot News
CM Ashok Gehlot NewsSarkarnama

Rajasthan Assembly Election News : विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. राजस्थानमधील परंपरा तोडत पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेसने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपनेही राजस्थानमध्ये सत्ता मिळवण्यासाठी रणनीती आखली आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये मोठी रंगत आली आहे. त्यातच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी थेट 'वॉर रूम'मध्येच रात्री बैठक घेतल्यामुळे त्याची मोठी चर्चा रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजस्थानमधील काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ नेत्यांची मंगळवारी रात्री पक्षाच्या 'वॉर रूम'मध्ये बैठक झाली. या भेटीचा फोटो मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या बैठकीत काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) केसी वेणुगोपाल, राजस्थानचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश हेही उपस्थित होते.

CM Ashok Gehlot News
Gurmeet Singh Kunnar : राजस्थानमध्ये काँग्रेस उमेदवाराचे निधन; 199 जागांवरच होणार निवडणूक

गेहलोत फोटो शेअर करत म्हटले की, "आम्ही एकत्र आहेत, पुन्हा जिंकत आहोत". फोटोमध्ये हे सर्व नेते वॉर रूममध्ये बसलेले दिसत आहेत. वेणुगोपाल मंगळवारी संध्याकाळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींसोबत जयपूरला पोहोचले होते. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे.

विशेष करून राजस्थामध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले होते. त्यामुळे निवडणुकीत या दोन्ही नेत्यांमधील वाद काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरेल, असे बोलेल जात होते. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवले. गेहलोत आणि पायलट यांचा एकत्रित फोटो हा काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारा असल्याचे बोलले जात आहे.

गेहलोत यांनीही या फोटोच्या माध्यमातून आम्ही एकत्र आहोत, असेच सांगितले आहे. राजस्थानच्या राजकारणात या फोटोची मोठी चर्चा रंगली आहे. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा राजस्थान दौरा लवकरच सुरू होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी 16 नोव्हेंबर रोजी तारानगरला जाहीर सभा घेणार आहेत.

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आणि निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित करण्यासाठी सर्व ज्येष्ठ नेते जयपूरमध्ये जमले असल्याचे मानले जात आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या जयपूरमध्ये उपस्थितीत राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

Edited by : Amol Jaybhaye

CM Ashok Gehlot News
Jammu Kashmir Accident: जम्मू-काश्मीरमध्ये बस अपघातात 36 जणांचा मृत्यू; मोदींनी केली मदतीची घोषणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com