K. Annamalai - Narendra Modi Sarkarnama
देश

Annamalai News : अण्णामलाईंसाठी मोदी-शहांचा दिल्लीतील ‘प्लॅन’ तयार; चंद्राबाबू देणार साथ...

Who is K Annamalai? A Rising BJP Leader with National Focus : भाजपने तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीसाठी अण्णाद्रमुकसोबत आघाडी केली आहे. त्यानंतर अण्णामलाई यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करण्यात आले आहे.

Rajanand More

Tamil Nadu News : तमिळनाडू भाजपचे लोकप्रिय नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांना दिल्लीत नेण्याची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केल्याचे समजते. त्यांच्या या प्लॅनला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलुगू देसम पक्षाचे सुप्रिमो चंद्राबाबू नायडू साथ देणार आहेत. पुढील काही दिवसांतच त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

भाजपने तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीसाठी अण्णाद्रमुकसोबत आघाडी केली आहे. त्यानंतर अण्णामलाई यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करण्यात आले आहे. तेव्हापासून अण्णामलाई यांना कोणते पद मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यातच आंध्र प्रदेशातील राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

आंध्र प्रदेशात राज्यसभेची एक जागा रिक्त आहे. वायएसआर काँग्रेसच्या एका खासदारांनी जानेवारी महिन्यांत सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. ही जागा नायडू यांनी भाजपसाठी सोडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या जागेवर भाजपकडून कुणाला संधी मिळणार, यावरून तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

राज्यसभेसाठी अण्णामलाई यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र, आंध्र प्रदेश हे दक्षिणेकडील राज्य असल्याने दक्षिणेकडील नेत्यालाच राज्यसभेत पाठविण्याबाबत भाजपकडून निर्णय घेतला जाऊ शकतो. अण्णामलाई हे द्रमुकसह काँग्रेस आणि विरोधकांबाबत अधिक आक्रमकपणे भूमिका घेतात. अभ्यासू नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. संघटनात्मक कौशल्याचेही शहांनी कौतुक केले होते. त्यामुळे त्यांना दिल्लीत नेले जाऊ शकते.

अण्णामलाई यांच्या नावाच्या चर्चेवर बोलताना भाजपचे तमिळनाडूचे राष्ट्रीय सहप्रभारी पोंगुलेटी सुधाकर रेड्डी यांनी सांगितले की, असे झाले तर चांगलेच आहे. पण अनेक गोष्टी असल्याने पक्षाच्या हायकमांडचा निर्णय़ अंतिम असेल, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. तर दुसऱ्या एका नेत्याने सांगितले की, या केवळ चर्चा आहेत. त्यांना संघटनेत किंवा संसदेत स्थान दिले जाऊ शकते. किंवा राज्यसभेवर एखादा मुस्लिम चेहराही पाठवला जाऊ शकतो.

दरम्यान, व्ही. विजयसाई रेड्डी यांनी 25 जानेवारीला राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी वायएसआर काँग्रेसलाही सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांची राज्यसभेची मुदत 21 जून 2028 पर्यंत होती. आता या जागेवारी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ता. 29 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर 9 मे रोजी मतदान आहे. सध्याची आंध्र प्रदेशातील स्थिती पाहता भाजपचा उमेदवार सहजपणे निवडणूक येऊ शकतो.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT