M.K. Stalin announces Kamal Haasan candidacy for MP Sarkarnama
देश

Kamal Haasan: मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला! अभिनेता होणार खासदार! DMKकडून कमल हासन यांची उमेदवारी जाहीर

TCM M.K. Stalin announces Kamal Haasan candidacy for MP post with DMK support: द्रमुकने पी. विल्सन यांना राज्यसभेसाठी पुन्हा संधी दिली आहे. एसआर शिवलिंगम, रुकय्या मलिक उर्फ कविगनर सलमा हेही द्रमुकचे उमेदवार असतील.

Mangesh Mahale

मक्कल निधि मैयम (एमएनएम) पक्षाचे प्रमुख आणि अभिनेता कमल हासन यांनी तमिलनाडूतील सत्ताधारी डीएमके सोबत जुळवून घेतल्यानंतर आता ते राज्यसभेचे खासदार होणार आहेत. द्रमुकने त्यांना मिळालेल्या सहा जागांपैकी एक जागा कमल हासन यांच्या पक्षाला दिली आहे. ते आता स्वतः राज्यसभेत जाणार की आपल्या पक्षातील सहकाऱ्याला संधी देणार हे लवकरच समजेल.

19 जून रोजी राज्यसभेची निवडणूक आहे. यासाठी तमिलनाडूतील सहा जागांपैकी चार जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सत्ताधारी द्रमुकने आज जाहीर केले. तीन जागांवर द्रमुक आपले उमेदवार उतवणार आहेत, एक जागा त्यांनी सहयोगी पक्ष मक्कल निधि मैयमला सोडली आहे.

मक्कल निधि मैयम (एमएनएम) पक्षाचे प्रमुख आणि अभिनेता कमल हासन हे उमेदवार असल्याची चर्चा आहे. पण त्यांच्या पक्षाकडून अद्याप घोषणा झालेली नाही, कमल हसान हे स्वत: किंवा पक्षातील अन्य सहकाऱ्याला हे निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे गुलदस्त्यात आहे.

द्रमुकने आपले ज्येष्ठ नेते पी. विल्सन यांना राज्यसभेसाठी पुन्हा संधी दिली आहे. एसआर शिवलिंगम, कवी, लेखक रुकय्या मलिक उर्फ कविगनर सलमा हेही द्रमुकचे उमेदवार असतील, असे पक्षाने जाहीर केले आहे.

द्रमुक आणि एमएनएममध्ये काय झाली होती डील?

2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिले तामिलनाडुमध्ये डीएमकेच्या नेतृत्वातील सरकारमध्ये एमएनएम पक्ष सहभागी झाला होता. लोकसभा निवडणुकीसाठी एमएनएमला एक जागा देण्यात आली होती. त्याशिवाय त्यांना राज्यसभेची एक जागा देणार असाही पर्याय दिला होता. 70 वर्षीय कमल हासन यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला होता.

तमिलनाडु विधानसभेत द्रमुक यांच्याकडे 134 आमदार आहेत. पक्षाला सहा पैकी चार आमदार मिळण्याची शक्यता आहे. दोन जागा एआयएडीएमके पक्षाला जाण्याची शक्यता आहे.

या सहा सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे.

बीरेंद्र प्रसाद बैश्य (भाजपा)

मिशन रंजन दास (भाजपा) अं

बुमणि रामदास (पीएमके)

एन. चंद्रशेखरन (एआयएडीएमके),

एम. शानमुगम (डीएमके)

पी. विल्सन (डीएमके)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT