Kamal Nath sarkarnama
देश

Madhya Pradesh : पराभव काँग्रेसच्या जिव्हारी, कमलनाथ यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा...

सरकारनामा ब्यूरो

Political News : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाला जागा आली आहे. कमलनाथ (Kamal Nath) यांनी निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.पक्षाने राजीनामा स्वीकारत जितू पटवारी यांना नवे प्रदेशाध्यक्ष केलं आहे. तर,उमंग सिंगार यांना विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे.या नव्या नेतृत्वामध्ये काँग्रेसला अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे जितू पटवारी यांची मध्यप्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. तसेच छत्तीसगडमध्ये पराभव होऊनही प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांना प्रदेशाध्यपदावर काम करण्यास मुदतवाढ दिली.छत्तीसगड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून चरणदास मंहत यांची निवड करण्यात आलेली आहे. राजस्थानबाबत अजूनही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, तेथेही बदल होतील,याचे संकेत पक्षाकडून देण्यात येत आहे.

विजयाची खात्री भोवली

कमलनाथ यांना मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस विजयी होणार याची खात्री होती.त्यामुळे त्यांनी अनेक बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जात आहे. छोट्या पक्षांना सोबत न घेण्याचा फटका त्यांना बसला. तसेच काँग्रेस नेतृत्वाकडून नेमण्यात आलेल्या रणनितीकारांच्या म्हणण्याप्रमाणे निवडणुक प्रचारयंत्रणा कमलनाथ यांनी राबवली नाही.त्याचा फटका काँग्रेल बसल्याचे काही वरिष्ठ नेत्यांना वाटत होते. त्यामुळे कमलनाथ यांनी राजीनामा देण्याबाबत दबाव होता.

नवा चेहरा बदल घडवणार

काँग्रेला कर्नाटकमध्ये विजय मिळवल्यानंतर नेत्यांचा आत्मविश्वास वाढला होता. मध्य प्रदेशात सहज विजय मिळेल, अशी येथील नेत्यांची धारणा होती मात्र, ज्या बहुमताने भाजपचे सरकार आले तो मोठा धक्का होता. त्यामुळे आता नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी काँग्रेसने जितू पटवारी यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. जितू पटवारी यांच्यावर विश्वास दाखवत या पराभवाचे सखोल विश्वलेषण करण्यात येत आहे. काँग्रेसला मध्य प्रदेशात पुन्हा मजबूत करण्यासाठी पटवारी हे काँग्रेस कमिटीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT