Lok Sabha Security Breach : सहावा आरोपी जेरबंद; संसदेत आत्मदहन करण्याचा प्लॅन; पण ऐनवेळी..

Lok Sabha Security Breach : सहावा आरोपी मूळ राजस्थानचा...
Lok Sabha Security Breach
Lok Sabha Security Breach Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : संसदभवनात 13 डिसेंबर रोजी घुसखोरी करुन स्मोक कँडल फोडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींच्या चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे होत आहेत. सभागृहात आत्मदहन करणे आणि पत्रके वाटणे, अशी कृती करण्याचा विचारही आरोपींचा होता. दिल्ली पोलिसांकडून ही माहिती आली आहे. हे सर्व आरोपी भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या पत्रावर संसद भवनात आले होते, आता सिम्हा यांचा जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकरणातील सहाव्या आरोपीला आता अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (La

Lok Sabha Security Breach
BJP Maharashtra : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आमदारांना दिले 'हे' टार्गेट!; 'देवगिरी'वर झाली महत्त्वाची बैठक

संसदेच्या सुरक्षा भेदल्या प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सहावा आरोपीचे नाव महेश कुमावत असे आहे. कुमावतला आज शनिवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. आरोपी महेश कुमावत हा मूळचा राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील रहिवासी आहे. संसदेत घुसखोरी झाली तेव्हा (13 डिसेंबर) आरोपी महेश हा दिल्लीत आला होता, अशीही माहिती पुढे येत आहे.

संसद घुसखोरी प्रकरणातील आरोपी सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली होती. दोघांनीही सभागृहात स्मोक कँडलमधून पिवळा धूर उडवत घोषणाबाजी केली. दुसरे आरोपी अमोल शिंदे आणि नीलम वर्मा या अन्य दोन आरोपींनीही 'छडी' संसद भवनाबाहेर 'हुकूमशाही चालणार नाही' अशा घोषणा दिल्या. पाचवा आरोपी ललित झा याने कॅम्पसबाहेर झालेल्या निषेधाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले होते.

Lok Sabha Security Breach
Babajani Durrani News : अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना सरकारचे 'अभय'

तपासाबाबत दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "घुसखोरीच्या कटाला अंतिम रूप देण्याआधी त्यांनी (आरोपींनी) काही मार्ग शोधून काढले होते, ज्यातून ते आपला संदेश सरकारपर्यंत पोहोचवू शकणार होते." आरोपींनी आधी स्वतःचे शरीर अग्निरोधक वेष्टनाने झाकून आत्महत्या करण्याचा विचार केला, पण नंतर हा विचार सोडून दिला, असे आरोपींनी चौकशीत सांगितल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com