kangana ranaut, mahatma gandhi sarkarnama
देश

कंगना पुन्हा बरळली ; म्हणाली, ''भगतसिंगांना फाशी द्यावी अशी गांधींची इच्छा होती''

कंगनाने (kangana ranaut) आता थेट महात्मा गांधी (mahatma gandhi) यांच्यावर टीका केली आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक न्यूज कटिंग आणि दोन मोठे संदेश पोस्ट केले आहेत.

सरकारनामा ब्युरो

पुणे : आपल्या बेताल विधानासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना राणावत (kangana ranaut) हिनं पुन्हा वादग्रस्त विधान केलं आहे. कंगनाने (kangana ranaut) आता थेट महात्मा गांधी (mahatma gandhi) यांच्यावर टीका केली आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक न्यूज कटिंग आणि दोन मोठे संदेश पोस्ट केले आहेत. कंगनाने पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे.

‘गांधी आणि इतर नेताजींना सोपवण्यास तयार झाले होते’ अशी या बातमीची हेडलाइन आहे. या रिपोर्टमध्ये महात्मा गांधींसोबत जवाहरलाल नेहरु तसंच मोहम्मद अली जिन्ना यांनी एका ब्रिटीश न्यायाधीशांसोबत सुभाषचंद्र बोस देशात आल्यानंतर त्यांना सोपवण्यात येईल असा करार केल्याचा दावा आहे. महात्मा गांधींना सत्तेची भूक होती असंही म्हटलं आहे.

''सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना त्यांच्याकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही असा दावा करताना दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते स्वातंत्र्य नाही असं म्हणत अहिंसेची खिल्ली उडवली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामला काही पोस्ट शेअर केल्या असून आपले हिरो निवडताना विचार करा,'' असा सल्ला कंगनाने दिला आहे.

कंगनाने महात्मा गांधींवर टीका करताना म्हटलं आहे की, “हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला कोणी एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा आणि अशाप्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी शिकवण दिली. अशाप्रकारे स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते. आपले हिरो हुशारीने निवडा”.

‘तुम्ही गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक, तुम्ही दोन्ही भूमिका घेऊ शकत नाही. निवडा आणि निर्णय घ्या’ असं या बातमीवर लिहिण्यात आलं आहे.स्वातंत्र्यसैनिकांना त्या लोकांनी ब्रिटीशांच्या हवाली केलं ज्यांच्यामध्ये लढण्याची हिंमत नव्हती, मात्र सत्तेची भूक होती,'' असा गंभीर आरोप कंगनाने केला आहे.

कंगनाने (kangana ranaut) दुसऱ्या पोस्टमध्ये म्हणते, ''गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींचे समर्थन केले नाही. असे बरेच पुरावे आहेत ज्यावरून असे दिसून येते की जर गांधीजींना भगतसिंगांना फाशी द्यायची असेल तर तुम्ही कोणाचे समर्थन करता ते तुम्ही निवडले पाहिजे, कारण या सर्व गोष्टी तुमच्या मनाच्या एकाच पेटीत टाकून त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणेही पुरेसे नाही, खरे तर हे मौन अतिशय बेजबाबदार आणि वरवरचे आहे. प्रत्येकाला त्यांचा इतिहास आणि नायकांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे,''

अभिनेत्री कंगना रणावतने स्वातंत्र्य हे भीकेत मिळाल्याचं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावर वाद उठलेला असतानाच अभिनेते विक्रम गोखले यांनी त्याचं समर्थन केलं. अवधूत गुप्तेसारखे गायकही अप्रत्यक्षपणे गोखलेंच्या बाजूनं उभे राहिले. ह्या सर्वांचा समाचार बुधवारी 'सामना'तून घेण्यात आला आहे.

राखी सावंत (Rakhi Sawant) हिनेही कंगनाच्या या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने असे म्हटले की, तिला कंगनाच्या या वादग्रस्त विधानामुळे धक्का बसल्याने थेट रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. याबद्दलचा एक व्हिडिओ सुद्धा तिने शेअर केला आहे. राखी सावंत हिने असे म्हटले की, मी रुग्णालयात असून नर्स माझे चेकअप करतेय. मी आजारी पडली, मला धक्का बसलाय. एक अभिनेत्री तिला नुकताच पद्मश्री पुरस्कार दिला गेला तिने असे म्हटले की, आपल्याला स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिलाले आहे. पण भीक म्हणून तुला पद्मश्री मिळाला आहे असे राखीने कंगना हिला सुनावले आहे. आमच्या देशातील जवानांनी कारगिलच्या युद्धात जो विजय मिळवला होता तर त्यांचे बलिदान व्यर्थ आहे का? ज्या प्रकारे कमेंट्स केल्या जात आहेत त्याबद्दल दु:ख होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT