Kangana Ranaut News : भाजपची खासदार कंगना रणौतने यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात ट्विट करत म्हटले होते की ट्रम्प हे लिजेंड आहेत पण नरेंद्र मोदी लिजेंडचे बाप आहेत. या ट्विटची चर्चा होत असताना अचनाकपणे तिने आपले ट्विट डिलीट केले. ट्विट डिलीट करण्यामागचे स्पष्टीकरण देखील कंगनाने दिले आहे.
कंगनाने म्हटले आहे की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या फोननंतर मी ट्विट डिलीट केले आहे. मी जे ट्विटमध्ये म्हटले होते ते माझे वैयक्तिक मत होते. माझे वैयक्तिक मत पोस्ट केल्याबद्दल वाईट वाटते आहे. नड्डा यांच्या सूचनेनंतर मी ट्विट आणि इन्स्टाग्रामवरील पोस्ट डिलिट केली आहे.
कंगानाने ट्विट करण्याचे कारण सांगताना म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ कूक यांना भारतात अॅपलचा कारखाना सुरू करण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. त्याबद्द मी माझे मत व्यक्त केले होते.
पाकिस्तान आणि भारतात शस्त्रसंधी झाल्यानंतर कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत मोदीजी हे महान नेता असल्याचे म्हटले होते. तर, काही दिवसांपूर्वी मोदी यांच्यामध्ये भगवान रामाचा अंश असल्याचे देखील म्हटले होते.
भारत पाकिस्तानमध्ये आपण मध्यस्थी करत शस्त्रसंधी केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तुम्हाला युद्ध हवे की व्यापार ते ठरवा असे देखील आपण दोन्ही देशांना ठणकावल्याचे ट्रम्प म्हटले होते. मात्र, त्यांनी आता त्यांच्या वक्तव्यावरून माघार घेत आपण मधस्थी केली नाही तर दोन्ही देशांच्या तणावाच्या स्थितीत मदत केल्याचे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.