Amit Shah Controversy : 'अमित शाह 'मातोश्री'च्या दारात घामाघूम होऊन उभे होते...बाळासाहेबांनी वाचवलं', संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

Bal Thackeray Saved Amit Shah : शहा यांनी काय केले हे साऱ्या जगाने पाहिलं. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी ते निर्घृणपणे वागले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Sanjay Raut’s new book reveals Bal Thackeray’s alleged role in protecting Amit Shah from riot allegations.
Sanjay Raut’s new book reveals Bal Thackeray’s alleged role in protecting Amit Shah from riot allegations.sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut On Amit Shah : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या तुरुंगातील आठवणीवर 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात अमित शाह आणि नरेंद्र मोदींविषयी धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. अमित शाहांना अडचणीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी कसे सोडवले याचा किस्सा देखील राऊतांनी सांगितला आहे.

" गुजरात दंगलीतील काही निर्घृण प्रकरणांचा तपास सीबीआयकडे होता. सीबीआयचा अमित शाह यांना जामीन देण्यास नकार होता. अमित शाह हे छोट्या जय शाहला घेऊन बाळासाहेबांना भेटायला आले होते. पण कलानगरच्या गेटवरच अमित शाहांना आडवून ठेवण्यात आले. ते घामाघूम झाले होते. दुसर्‍या दिवशी अमित शाह पुन्हा मातोश्रीवर आले बाळासाहेबांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली.", असे राऊत यांनी पुस्तकात म्हटले आहे.

Sanjay Raut’s new book reveals Bal Thackeray’s alleged role in protecting Amit Shah from riot allegations.
BMC Elections : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेतृत्व ठरले, थेट दिल्लीतून दिले आदेश!

गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगतोय, अशी दर्दभरी रोमांचक कहाणी शाहांनी बाळासाहेबांना सांगितली. अमुत तमूक न्यायामूर्तीसमोर केस सुरू आहे, असे देखील शहा म्हणाले. त्यावर बाळासाहेबांनी विचारले तर मग मी काय करू? शहा म्हणाले, आप बात करेंगो न्यायमूर्ती आपली बात मान लेंगे. बाळासाहेबांनी मनोहर जोशींच्या फोनवरून फोन करून न्यायमूर्तींना सांगितले तुम्ही पहिले हिंदू आहात हे विसरू नका. बाळासाहेबांनी अमित शाहांना वाचवले.'

शाह ठाकरे कुटुंबाशी निर्घृण वागले

संजय राऊतांनी आपल्या पुस्तकात म्हटले की, बाळासाहेबांनी अमित शाहांना वाचवले. पण शहा यांनी काय केले हे साऱ्या जगाने पाहिलं. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी ते निर्घृणपणे वागले. नरेंद्र मोदी यांना अटक करण्याचा देखील विचार होता. मात्र, शरद पवारांनी कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये त्याला विरोध केला. त्या उपकाराची जाणीव मोदींनी ठेवली आहे का? असा सवाल देखील पुस्तकात राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut’s new book reveals Bal Thackeray’s alleged role in protecting Amit Shah from riot allegations.
S.Jaishankar: पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! ऑपरेशन सिंदूरनंतर एस.जयशंकर यांचा नवा डाव; 'दिल्ली टू काबुल'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com