Nitin Gadkari Kangana Ranaut  sarkarnama
देश

Kangana Ranaut : नितीन गडकरींनी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाला कंगना रनौतचा विरोध

Roshan More

Kangana Ranaut News : सहा महिन्यांपूर्वी हिमाचल प्रदेशातील 272 कोटींचा प्रकल्प असणाऱ्या रोपवेचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. मात्र, याच प्रकल्पाला भाजपच्याच खासदार कंगना रनौत या विरोध करत आहेत. या प्रकल्पाचा निषेध कंगना यांच्याकडून करण्यात येत आहे.

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील खरहाल व्हॅलीमध्ये बिजली महादेव रोपवेची घोषणा नितीन गडकरी यांनी केली होती. मात्र,याच भागातील नागरिकांनी या प्रकल्पला विरोध केला होता. आता या नागरिकांच्या बाजुने कंगना रनौत या देखील मैदानात उतरल्या आहेत.

बिजली महादेव रोपवेच्या विरोधात ग्रामस्थांनी अनेकवेळा रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. हा रोपवे बांधल्याने ग्रामस्थांच्या रोजगारावर मोठा परिणाम होणार आहे. तसेच रोप वेच्या बांधकामात अनेक झाडे तोडली जाणार असल्याने पर्यावरणाचीही हानी होणार आहे. या रोपवेने देव देखील खूश होणार नाही, असे येथील ग्रामस्थ सांगत आहेत.

कंगना यांनी प्रकल्पाच्याविरोधात ग्रामस्थांना पाठींबा दिला आहे. रोपवे तयार झाला तर एका दिवसात 36 हजार पर्यटक बिजली महादेवापर्यंत पोहोचतील आणि येथील पर्यटनालाही मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.सध्या पर्यटकांना बिजली महादेवापर्यंत पोहोचण्यासाठी 2 ते 3 तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र, रोपवेद्वारे पर्यटकांना अवघ्या सात मिनिटांत बिजली महादेवापर्यंत पोहोचता येणार आहे. एका तासात 1200 लोक पोहोचतील.

काय आहे बिजली महादेव?

बिजली महादेव मंदिर 2460 मीटर उंचीवर आहे कुल्लू खोऱ्यातील काशवारी या गावात वसलेले आहे. भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचे नाव बिजली महादेव पडण्यामागे एक अख्यायिका सांगितली जाते. 12 वर्षांनी मंदिरात बसवलेल्या शिवलिंगावर वीज पडली होती आणि त्यानंतर शिवलिंगाचे तुकडे झाले होते असे म्हणतात. त्यानंतर येथील पुजाऱ्याने हे तुकडे गोळा करतात त्यांना डाळीचे पीठ, धान्य आणि लोणी इत्यादींची पेस्ट घालून जोडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT