Mumbai University Senate Election : भाजपला ज्याची भीती होती तेच घडलं! ठाकरेंनी मैदान मारलं

Mumbai University Senate Election 2024 Result ABVP YuvaSena Shivsena: मुंबई विद्यापीठाच्या 10 जागांवरील सिनेट निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार मैदानात उतरले आहेत. 24 सप्टेंबरला सिनेट निवडणुकीच मतदान प्रक्रिया ही पार पडली होती.
Aaditya thackeray
Aaditya thackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या 10 पैकी 10 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. शिवसेनेची (यूबीटी) युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत झाली. या लढतीमध्ये सर्व 10 जागांवर युवासेनेने एकतर्फी विजय मिळवला. विरोधकांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.

मुंबई विद्यापीठाच्या 10 जागांवरील सिनेट निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार मैदानात उतरले होते. 24 सप्टेंबरला सिनेट निवडणुकीच मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यात एकूण मतदानाच्या 55 टक्के मतदान झाले होते.

Aaditya thackeray
Devendra Fadnavis : "बहीण चिडली असेल तर समजून घेऊ, पण जाणीवपूर्वक...." मंत्रालयातील तोडफोड प्रकरणावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

युवासेना आणि अभाविपकडून सर्व दहा जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर छात्रभारतीने चार, मनसेने, एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता. विशेष म्हणजे शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून एकही उमेदवार सिनेटच्या निवडणुकीच्या मैदानात नव्हता.

या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात युवासेना न्यायालयात गेली होती. उच्च न्यायालयाने सरकारला फटकारत निवडणूक 24 सप्टेंबरलाच घेण्याचे आदेश दिले होते.

काही विद्यार्थी पुन्हा उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायलयात गेले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने देखील उच्च न्यायलायाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता.

युवासेनेचे उमेदवार

प्रदीप सावंत

मिलिंद साटम

परम यादव

अल्पेश भोईर

किसन सावंत

स्नेहा गवळी

शीतल शेठ   

मयूर पांचाळ  

धनराज कोहचडे 

शशिकांत झोरे

Aaditya thackeray
Shivsena Vs BJP : भाजपच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे उपोषण, काय आहे प्रकरण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com