Kangana Ranaut Sarkarnama
देश

Kangana Ranaut Slapped News : कंंगनाशी 'पंगा' घेणं भोवलं; कानशिलात लगावणारी महिला निलंबित

Kangana Ranaut slapped by CISF security at Chandigarh Airport : बॉलिवूड अभिनेत्री व भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतसोबत गुरुवारी (ता.6) धक्कादायक प्रकार घडला.

Deepak Kulkarni

Chandigarh News : बॉलिवूड अभिनेत्री व भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतसोबत गुरुवारी (ता.6) धक्कादायक प्रकार घडला. चंदीगड विमानतळावरून दिल्लीला जात असताना सिक्युरिटी चेक करून बोर्डिंग एरियाकडे जाताना संबंधित महिला गार्ड आणि कंगनामध्ये वाद निर्माण झाला.

त्यानंतर महिलेने कंगना रनौतच्या थेट कानशिलात लगावली. यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. पण आता त्याआधीच 'सीआयएसएफ'ने संबंधित महिलेवर मोठी कारवाई करताना तिला सेवेतून तत्काळ निलंबित केले आहे.

चंदीगड विमानतळावर भाजप नेत्या आणि अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut ) थप्पड मारल्याप्रकरणी सीआयएसएफने महिला कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे आणि एफआयआरसाठी स्थानिक पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध तक्रार दिली आहे, असे सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कंगना रनौतला चंदीगढ विमानतळावर CISF च्या महिला गार्डने कानशिलात लगावल्याचे वृत्त आहे. याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.कंगनाकडून संबंधित महिला गार्डवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. कुलविंदर कौर असे या महिलेचे नाव असून तिचे विमानतळावरील फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

चंदीगड विमानतळावरून दिल्लीला जात असताना हा प्रकार घडला आहे. सिक्युरिटी चेक करून बोर्डिंग एरियाकडे जाताना संबंधित महिला गार्ड आणि कंगनामध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर महिलेने कानशिलात लगावल्याचा आरोप कंगनाने केला आहे.

दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असताना त्याबाबत कंगनाकडून वादग्रस्त विधान करण्यात आले होते. कंगनाकडून त्यांचा उल्लेख खलिस्तानी असा केला होता. त्यावरूनच संबंधित महिला गार्डने कंगनाशी वाद घातल्याची चर्चा सोशल मीडियात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT