Kangana Ranaut : CISF च्या महिला गार्डने कंगना रनौतच्या कानशिलात लगावली...

Kangana Ranaut Slapped By CISF Guard : कंगना रनौत चंदीगड विमानतळावर असताना हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
Kangana Ranaut
Kangana RanautSarkarnama
Published on
Updated on

Chandigarh : बॉलीवूड अभिनेत्री व भाजपच्या खासदार कंगना रनौतला चंदीगढ विमानतळावर CISF च्या महिला गार्डने कानशिलात लगावल्याचे वृत्त आहे. याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

कंगनाकडून संबंधित महिला गार्डवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. कुलविंदर कौर असे या महिलेचे नाव असून तिचे विमानतळावरील फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

चंदीगड विमानतळावरून दिल्लीला जात असताना हा प्रकार घडला आहे. सिक्युरिटी चेक करून बोर्डिंग एरियाकडे जाताना संबंधित महिला गार्ड आणि कंगनामध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर महिलेने कानशिलात लगावल्याचा आरोप कंगनाने केला आहे.

Kangana Ranaut
Rahul Gandhi on Stock Market : मोठी बातमी : मोदी-शाहांनी घडवला 'शेअर मार्केट स्कॅम'; राहुल गांधींचा पहिला वार

दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असताना त्याबाबत कंगनाकडून वादग्रस्त विधान करण्यात आले होते. कंगनाकडून त्यांचा उल्लेख खलिस्तानी असा केला होता. त्यावरूनच संबंधित महिला गार्डने कंगनाशी वाद घातल्याची चर्चा सोशल मीडियात आहे.

दरम्यान, कंगनाने हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचा त्यांनी दारुण पराभव केला. खासदारकी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीला जात असताना हा प्रकार घडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com