Kangana Ranaut and Uddhav Thackeray Sarkarnama
देश

Kangana Ranaut and Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या निवडणूक निकालावरून कंगना रणौतने उद्धव ठाकरेंना लगावला टोला, म्हणाल्या..

Kangana Ranaut News : संभलच्या घटनेवरून त्यांनी कंगना रणौत यांनी एक है तो नेक है नारा दिला आणि म्हटले की अगर बटेंगे तो कटेंगे

Mayur Ratnaparkhe

Kangana Ranaut Maharashtra Vidhansabhae Election Result : खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं की देश तोडण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला आहे. काँग्रेसला जनतेने उत्तर दिलं आहे. बलिदान देऊन हा देश बनला आहे, काही मूर्ख एकत्र आल्याने देशाचे तुकडे नाही होवू शकत.

हिमाचलमधील भुंतर विमानतळावरून दिल्लीला रवाना होण्याआधी कंगना रणौत(Kangana Ranaut) यांनी म्हटले की, महाराष्ट्राच्या लोकांनी विकास आणि स्थिर सरकारसाठी मतदान केलं. महायुतीच्या विजायवर प्रत्येक कार्यकर्ता उत्साही आहे. आमच्या पक्षाचा हा ऐतिहासिक विजय आहे. आम्ही संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचे आभार मानतो आहोत.

भाजप(BJP) पक्षश्रेष्ठी लवकरच पुढील मुख्यमंत्री ठरवतील. आमच्या पक्षाच्या विचारधारेनुसार मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल. आमच्याकडे एकापेक्षा एक नेतृत्वासाठी सरस लोक आहेत. कंगना रणौत यांनी सांगितले की प्रचारादरम्यान मी प्रत्येक मुलास मोदी-मोदीचा नारा देताना बघितलं.

याशिवाय पंतप्रधान मोदींनी(Modi) म्हटले की, पंतप्रधान मोदी जगातील सर्वात मोठे नेते आहेत. इतिहास साक्षी आहे, की महिलांचा सन्मान करणारे देवता असतात आणि महिलांचा अपमान करणारे दानव असतात. दानवांचा नेहमीच पराभव होतो.

तसेच, तुम्ही सर्वांनीच बघितलं की माझा बंगला तोडला गेला. मला शिव्या दिल्या गेल्या. ऐनवेळी त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती. दानवांचा पराभव झाला आहे. तसेच संभलच्या घटनेवरून त्यांनी कंगना रणौत यांनी एक है तो नेक है नारा दिला आणि म्हटले की अगर बटेंगे तो कटेंगे. आम्हाला एकजुट होवून याची निंदा केली पाहीजे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT