Elon Musk News : इलॉन मस्क यांनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेचे केले कौतुक, म्हणाले 'अमेरिकेत...'

Elon Musk on America Election : अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी घोषित करण्यात आलेलं आहे. मात्र...
Elon Musk
Elon MuskSarkarnama
Published on
Updated on

Elon Musk on Indias election process : मायक्रो ब्लॉगिंग साइट एक्सचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या इलॉन मस्क यांनी भारताच्या निवडणूक व्यवस्थेची स्तुती करत अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सोशल मीडियावर एका युजरने पोस्ट केली, ज्यामध्ये एका लेखाचा मथाळा होता. त्यात लिहिले आहे, भारतात एका दिवसांत ६४ कोटी मतांची मोजणी झाली. हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. इलॉन मस्कने या पोस्टवर रिअॅक्ट करत भारताच्या निवडणूक प्रक्रियेची प्रशंसा केली आहे.

Elon Musk
Parliament Sesson 2024 : संविधानावरून मोदींचा पुन्हा मास्टरस्ट्रोक? महत्वाची माहिती उजेडात आणणार...

पोस्टवर प्रतिक्रिया देताना इलॉन मस्क(Elon Musk) यांनी लिहिले की, ''भारतात एका दिवसात 64 कोटी मतांची मोजणी झाली. मात्र कॅलिफोर्नियात आतापर्यंत मतमोजणी आहे.'' अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होवून दोन आठवड्यांपेक्षाही जास्त कालावधी झालेला आहे. परंतु अद्यापही मतमोजणी झालेली नाही. यावरूनही सोशल मीडियावर एका युजर्सने पोस्ट केली. यावरही प्रतिक्रिया देताना मस्क यांनी दु:खद म्हटले.

Elon Musk
Rahul Gandhi : महायुतीच्या त्सुनामीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्रातील निकाल...

अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी घोषित करण्यात आलेलं आहे. मात्र कॅलिफॉर्नियामध्ये आतापर्यंत सर्व बॅलेट पेपरची प्रतिक्रिया झालेली नाही. कॅलिफोर्नियामध्ये 1.6 कोटी लोकांनी मतदान केलं होतं. यामध्येही मोठ्यासंख्येने मेलद्वारे मतदान केलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com