Kapil Mishra Sarkarnama
देश

BJP Politics : भाजप सरकारमध्ये मंत्री झाले, पण 5 वर्षांपूर्वीची केस पाठ सोडेना! पक्षावरही नामुष्की?

Kapil Mishra Minister News BJP Government Minister Issues : कपिल मिश्रा आम आदमी पक्षातून राजकारणात सक्रीय झाले होते. ते केजरीवाल सरकारमध्ये मंत्रीही होते.

Rajanand More

New Delhi News : दिल्लीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत सत्तास्थापन केली. पण सरकारमधील एका मंत्र्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम आदमी पक्षासह भाजप सरकारमध्येही मंत्री राहिलेले एकमेव नेते म्हणजे कपिल मिश्रा. त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी पाच वर्षांपूर्वी दाखल केलेला गुन्हा त्यांची पाठ सोडताना दिसत नाही.

कपिल मिश्रा आम आदमी पक्षातून राजकारणात सक्रीय झाले होते. ते केजरीवाल सरकारमध्ये मंत्रीही होते. पण 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आपमध्ये असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांवर ते सडकून टीका करायचे. त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ते अडचणीतही आले होते. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांची आक्रमकता कमी झाली नाही.

विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या एका विधानामुळे गुन्हा दाखल झाला. धार्मिक तेढ निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आता ते मंत्री झाल्यानंतर या प्रकरणाने डोके वर काढले आहे. आपण कोणत्याही समाजाला उद्देशून बोललो नाही, असे सांगत या प्रकरणाची कोर्टात असलेली सुनावणी बंद करावी, अशी मागणी करणारी याचिका मिश्रा यांनी कोर्टात दाखल केली होती.

मिश्रा यांची याचिका दिल्लीतील कोर्टाने फेटाळली. त्यानंतर त्यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. पण तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. कोर्टाकडून या प्रकरणाची सुनावणी पुढेही सुरूच ठेवली जाणार, हे स्पष्ट आहे. याप्रकरणी मिश्रा दोषी आढळल्यास त्यांना किमान तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.

कायद्यानुसार दोन किंवा दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास लोप्रतिनिधीचे पद रद्द होते. त्यामुळे मिश्रा यांच्यासमोरही आता शिक्षेचा टांगती तलवार असणार आहे. कोर्टात या प्रकरणाची सुनावणी किती दिवस सुरू राहणार, यावरही बरेचसे अवलंबून असणार आहे. अनेक प्रकरणांचा निकाल लागण्यास मोठा विलंब लागतो. या प्रकरणाला आत्ताच पाच वर्षे झाली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT