Kapil Sibal CJP Legal Aid Sarkarnama
देश

Kapil Sibal CJP Legal Aid : विद्यार्थी आंदोलकांच्या पाठीशी कपिल सिब्बल; CJPच्या कायदेशीर लढ्यासाठी एक कोटींची मदत, 'खोटे गुन्हे दाखल झाले तर देशभरातील वकील उभे राहतील'

Kapil Sibal pledges Rs 1 crore legal fund for CJP student protesters : दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनातील विद्यार्थी आणि आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप; कायदेशीर मदतीसाठी वेबसाइट उभारण्याची घोषणा, देशभरातील वकिलांना सहभागी होण्याचे कपिल सिब्बल यांचे आवाहन.

Pradeep Pendhare

Delhi Protest : दिल्ली जंतर मंतरवरील काॅक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे, त्यांना गुंडाकरून मारहाण करण्याचे प्रकार सुरू आहेत. विद्यार्थी आंदोलकांना कायदेशीर प्रक्रियेत सरकार आणि दिल्ली पोलिस प्रशासन अडकवत असताना, त्यांच्या मागे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल उभे राहिले आहे.

विद्यार्थी आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातील, तर आमचे देशभरातली वकील त्यांना कायदेशीर मदत करतील, असे सांगताना CJP आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या कायदेशीर मदतीसाठी कपिल सिब्बल यांनी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या या भूमिकेने CJP आणि आंदोलक विद्यार्थ्यांना कायदेशीर बळ मिळालेच आहे. परंतु सत्ताधारी आणि दिल्ली पोलिसांना (Police) मात्र आव्हान निर्माण करणारे ठरले आहे. कपिल सिबल्ल आणि CJP यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

अपक्ष राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल म्हणाले, "सीजेपी एक अशी यंत्रणा उभी करणार आहे, ज्याद्वारे कोणत्या ठिकाणी काय घडले, कोणता विद्यार्थी (Student) किंवा आंदोलक प्रभावित झाला आणि त्यांच्याविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली, याचा मागोवा घेतला जाईल. तसेच, कायदेशीर मदत करू शकणाऱ्या वकिलांचीही ओळख पटवली जाईल.

यासाठी एक संकेतस्थळ (वेबसाइट) तयार करण्यात येईल. या संकेतस्थळावर कायदेशीर मदत देण्यास इच्छुक असलेले वकील आपले नाव, स्थान आणि ते कोणत्या प्रकारची मदत देऊ शकतात, याची नोंदणी करू शकणार आहे. याचवेळी मी या उपक्रमासाठी एक कोटी रुपयांचे योगदान देणार असल्याचे कपिल सिब्बल यांनी जाहीर केले.

कपिल सिब्बल यांचे वकिलांना आवाहन

तसेच, देशभरातील वकिलांनी आणि इतर नागरिकांनीही या निधीत योगदान द्यावे, असे मी आवाहन कपिल सिब्बल यांनी केले. जिथे जिथे कायद्याचा गैरवापर केला जाईल आणि शांततापूर्ण आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातील, तिथे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. आमचे वकील देशभरात त्यांना कायदेशीर मदत करतील, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले.

विद्यार्थी आंदोलकांवर पाळत

दरम्यान, केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारच्या तीन आश्वासनानंतर CJPने आंदोलन मागे घेतले. धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबत विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करणार नाही, अशी लेखी हमी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली होती. मात्र, विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले जात असून त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचे समोर येत आहे. CJPचे प्रवक्ते आशितोष रांका यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

'काॅक्रोच' पुन्हा आक्रमक होणार?

यामुळे विद्यार्थी आंदोलक पुन्हा आक्रमक होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. दिल्लीत जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलनाची हाक यातून दिली जाऊ शकते, अशी शंका आता व्यक्त केली जाऊ लागली आहे. तसे झाल्यास केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारची डोकेदुखी वाढू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT