Kapil Sibal on Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देण्यासाठी इंडिया आघाडीने दिल्लीत जनमहाभियोगानंतर आज दिल्लीत मोर्चा निघत आहे. निवडणूक आयोगाकडील अनियमिततेचे अनेक पुरावे काँग्रेसकडे आहेत. यातून ज्ञानेश कुमार यांची सुटका नाही, असा इशारा काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला आहे. या जनमहाभियोगावर ज्येष्ठ विधिज्ञ खासदार कपिल सिब्बल यांनी मोठा प्रतिक्रिया समोर आली.
"गेल्या 12 वर्षांत पहिल्यांदाच आमचे म्हणणे ऐकून घेतले गेले आहे. आज रामलीला मैदानावर सरकारविरोधात जनतेच्या मनातील तीव्र नाराजी दिसेल," असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ खासदार कपिल सिब्बल (Kapil Sibal) म्हणाले, "गेल्या 12 वर्षांपासून आमचे म्हणणे कोणीही ऐकून घेत नाही. देशातील जनतेसमोर आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी मिळालेली नाही. संसदेत म्हणणे ऐकून घेतले जात नाही. प्रश्न उपस्थित केले जात नाहीत, तसेच कोणत्याही विषयावर चर्चा किंवा वादविवादही होऊ दिला जात नाही."
ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्याकडे गेलो, तर ते आम्हाला 'चालते व्हा' असे सांगतात. राष्ट्रपतींकडे गेल्यानंतरही काहीच घडत नाही आणि न्यायालयांमध्येही कोणताही निकाल दिला जात नाही. मग आम्ही नेमके जायचे तरी कुठे? गेल्या 12 वर्षांत पहिल्यांदाच आमचे म्हणणे ऐकून घेतले गेले आहे. आता निवडणुका अशा पद्धतीने होऊ शकत नाहीत, असा विश्वास लोकांमध्ये या जनमहाभियोगाद्वारे निर्माण झाला आहे. रामलीला मैदानावर या सरकारविरोधात जनतेच्या मनात असलेली तीव्र नाराजी पाहायला मिळेल, असेही कपिल सिब्बल यांनी म्हटले.
जनमहाभियोगाद्वारे सहा जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. ज्ञानेश कुमारे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यानुसार काम करत असल्याचा प्रमुख आरोप आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली.
भाजप नेते रविशंकर प्रसाद, संबित पात्रा यांनी विरोधकांच्या जनमहाभियोगाची खिल्ली उडवली. गांधी यांचे नेतृत्व आणण्यासाठी कितीही मोर्चे काढा, आंदोलन करा, काहीही फरक पडणार नाही, असा टोला भाजपने लगावला आहे. तसेच, मतदार यांद्याबाबत काँग्रेस अपप्रचार करत आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना डावलून पंतप्रधानपद पटकावले ही देशातली पहिली मतचोरी होती, असा दावा संबित पात्रा यांनी करून काँग्रेसच्या जनमहाभियोगाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.