Mahayuti Government : 'महायुती कोसळेल!' काँग्रेस नेत्याचे मोठे भाकीत; विधान परिषदेच्या निकालानंतर सत्ताधाऱ्यांत भूकंप

Congress Balasaheb Thorat predicts Mahayuti government may collapse amid internal conflicts, mistrust and growing tensions after Maharashtra Legislative Council election results : विधान परिषदेच्या निवडणुकीतील अपयशानंतर भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत आरोप-प्रत्यारोप; महायुतीत प्रचंड अस्वस्थता, अविश्वास आणि असंतोष असल्याचा बाळासाहेब थोरातांचा दावा.
Mahayuti Government
Mahayuti GovernmentSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mahayuti Internal Conflict : राज्यातील पाच विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महायुतीमधील खदखद समोर येऊ लागली आहे. या निवडणुकीतील अपयशाचे संपूर्ण खापर भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीचेने एकनाथ शिंदे शिवसेनेवर फोडले आहे. यातून महायुतीमधील आरोप-प्रत्यारोप होऊन, ते नेत्यांच्या वैयक्तिक पातळीवर गेले आहे.

यातूनच महायुतील वाद, प्रचंड अस्वस्थता, अविश्वास, असंतोष, दुष्काळात शेतकऱ्यांना दिलेली तुटपुंज मदत, अर्थव्यवस्थेची डबघाई, योजनांमधील गैर कारनामे हे सर्व घेऊन महायुती आपोआप कोसळेल असा दावा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, "महायुतीत सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप उघड झाले आहे. अंतर्गत मोठ्याप्रमाणात खळबळ सुरू आहे. प्रचंड वाद, अस्वस्थता आहे. असंतोष आहे. पुढचे संकेत असे मिळत आहे की, त्यामुळे यांच्यातील अस्वस्थता दिसून येते. महायुतीमधील हे वाद थोडेसेच बाहेर आलेले आहेत. एखादा टक्का सुद्धा बाहेर मिळत नाही. पण आता हे वाद बाहेर आले आहेत. यांच्यात काहीतरी चालू आहे. यांच्यात यापेक्षा खूप मोठी खळबळ सुरू आहे. एकमेकांविरोधात अविश्वास आहे. त्याचे परिणाम लवकरच दिसतील."

आता रडतखडत सुरू आहे. अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे. दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकरी (Farmer), भूमिहीन आणि शेतमजूर यांना जी मदत व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही. यांचा कुठेच विचार महायुतीत केलेला नाही अजून! असेही निरीक्षण बाळासाहेब थोरात यांनी नोंदवले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजारांची अग्रीम मदत केली आहे. शेतकऱ्यांवर आभाळ फाडले आहे. या पाच हजार रुपयांनी काय होणार आहे? असाही प्रश्न थोरातांनी केला.

Mahayuti Government
Ahilyanagar DCC Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेत राम शिंदेंना मोठा धक्का : दोन समर्थक उमेदवारांची माघार; विखेंशी प्रतिष्ठेची लढाई कायम

अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला निघाली आहे. महायुतीच्या आतापर्यंत योजना, त्याचे इस्टिमेट, यातून त्यांचे सुरू झालेले गैर कारनामे यातूनच अर्थव्यवस्था डबघाईला निघाली आहे. ही अर्थव्यवस्था, असंतोष, एकमेकांविषयी असलेले अविश्वास हे घेऊन महायुती किती काळ चालेल, मला वाटते की आपोआपच कोसळेल, असे मोठे भाकीत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

Mahayuti Government
Raghuram Rajan on Rupee Fall : रुपयाच्या घसरणीवर रघुराम राजन यांचा मोदी सरकारला सल्ला; RBI ला दिला महत्त्वाचा इशारा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.