Congress Hasta Operation News :
Congress Hasta Operation News :  Sarkarnanama
देश

Karnataka Election : भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'चा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसचं 'ऑपरेशन हस्त' !

Chetan Zadpe

Congress Operation Hasta to counter Operation Lotus : बहुतांशी एक्झिट पोलने (Karanataka Exit Poll) काँग्रेस सरकार बनवाणार असा अंदाज व्यक्त केला आहे. तर काही पोलनुसार कर्नाटकात त्रिशंकू विधानसभेची शक्यता वर्तवली आहे. आता प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ची शक्यता लक्षात घेऊन, याचा मुकाबला करण्यासाठी 'ऑपरेशन हस्त' (ऑपरेशन हात- पक्ष चिन्हं) तयारी केली आहे.

काँग्रेसने आपल्या निवडून येणाऱ्या संभाव्य विजयी आमदारांच्या घरापुढे केंद्रीय काँग्रेसचे प्रतिनिधींना बसवले आहे. तसेच काँग्रेस संभाव्य आमदारांचा गट घेऊन लवकरच जयपूर येथे दाखल होण्याची शक्यता आहे. जर काँग्रेस-भाजपच्या बहुमताचा आकडा गाठण्यास अडचणी निर्माण झाल्यास आणि जेडीएस किंगमेकर म्हणून उभा राहिल्यास घोडेबाजाराची शक्यता आहे. यासाठी आता काँग्रेस अधिक दक्ष झाले, असून निवडून येणाची अधिक शक्यता असलेल्या आपल्या उमेवारांवर काँग्रेसने करडी नजर ठेवली आहे.

काँग्रेसने संभाव्य आमदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवले आहे. आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्याची रणनीती काँग्रेस आखत आहे. तर दुसरीकडेजेडीएस पक्षाला २०१८ विधानसभा निकालासारखी परिस्थिती अपेक्षित आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांपैकी प्रादेशिक पक्ष असलेल्या जेडीएसचे निवडून येणारे काही आमदार जुळवून घेण्याचा विचार करण्याची शक्यता आहे. जेडीएसचा प्रयत्न असेल की, नवनिर्वाचित आमदारांचे पलायन रोखणे.

"दोन्ही राष्ट्रीय पक्ष निश्चितपणे आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतील कारण - त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ मिळणार नाही," असा दावा जेडी(एस) नेते एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. “आम्ही सावध आहोत आणि आमचा आमदारांचा गट एकत्र ठेवण्यासाठी खबरदारी घेत असताना, आमच्या मदतीशिवाय कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकणार नाही, याची आम्ही खात्री करू," असे कुमारस्वामी म्हणाले.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, काँग्रेसला 150 पेक्षा कमी जागा मिळाल्यास भाजप त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करेल." दरम्यान, काठावर बहुमत मिळाले किंवा बहुमतासाठी काही आमदारांची गरज पडली तर काँग्रेसनेही संख्याबळ जमवण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे. जेडी(एस)च्या काही संभाव्य विजयी होणाऱ्या उमेदवारांशी यापूर्वीच चर्चा सुरू असल्याची चर्चा होती.

“आपण वस्तुस्थितीकडे पाहूया. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळण्याची खात्री असताना, प्रतिस्पर्धी पक्षांच्या घोडेबाजाराची घडू न देण्याची आणि अनैतिक मार्गाने भाजपला सरकार स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी आम्ही पुरेशी काळजी घेतली पाहिजे, गेल्या पाच वर्षांत कर्नाटकात बरेच काही बदलले असून भाजपचा डाव यशस्वी होणार नाही.” असे प्रदेश काँग्रेस मीडिया कमिटीचे अध्यक्ष प्रियांक खर्गे म्हणाले.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसच्या प्रचाराचे प्रभारी बीके हरिप्रसाद म्हणाले की, 'काँग्रेस अधिक आक्रमक झाली आहे. आमची कर्नाटक युनिट आता जुनी काँग्रेस राहिलेली नाही, जी मवाळ होती आणि पक्षांतर रोखण्यास अक्षम होती. मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाही. आम्ही जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सवदी यांसारख्या ज्येष्ठ लिंगायत नेत्यांना आमच्या गोटात आणून भाजपला धक्का दिला. असे आणखी धक्के भाजरला पक्षाला बसणार आहेत."

2018 मध्ये भाजप (BJP News) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, परंतु बहुमतापासून नऊ जागांनी कमी पडला. कर्नाटकात जेडी(एस) आणि काँग्रेसने युतीचे सरकार स्थापन केले असताना, भाजपने काँग्रेस आणि जेडी(एस) मधील 17 आमदारांना आपल्या गोटात सामील करून काँग्रेसचे सरकार पाडून भाजपने 2019 सरकार स्थापन केले.

या वेळीही अशाच घडामोडी घडतील या शक्यतांना भाजपचे पदाधिकारी नाकारत नाहीत. “आम्हाला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याने भाजपला इतर पक्षांचे आमदार घेण्याची गरज भासणार नाही. ‘ऑपरेशन हस्त’ राबविण्याची काँग्रेसची (Congress) योजना केवळ स्वप्नवत राहील, असे भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या निमंत्रक शोभा करंदलाजे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT