Karnataka Election : कर्नाटकात पराभव झाल्यास दक्षिणेतून भाजपचा परतीचा प्रवास; दक्षिणतेल्या राजकारणाचं महत्त्व काय?

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक निवडणुकीचं राजकीय महत्त्व काय? देशाच्या राजकारणावर काय फरक पडणार?
Karnataka Assembly Election 2023 : Narendra Modi : Amit Shah
Karnataka Assembly Election 2023 : Narendra Modi : Amit Shah Sarkarnama

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच शनिवारी लागणार आहे. मात्र त्याआधी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाज यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धडकी भरली आहे. बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजात भाजपचा पराभव आणि काँग्रेसच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे.

इंडिया टुडे-अॅक्सिस एक्झिट पोलनुसार काँग्रेसला सर्वाधिक 122 ते 140 जागा मिळू शकतात, तर भाजपची गाडी 62 ते 80 जागा मिळू शकतात. तर जेडीएसला 20 ते 25 जागा आणि इतरांना जवळपास तीन जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (BJP's journey back from south if defeated in Karnataka)

कर्नाटक निवडणुकीचे राजकीय महत्त्व :

कर्नाटक विधानसभेची निवडणूक ही केवळ एका राज्याची सर्वसाधरण निवडणूक नसून, ती आगामी राजकारणाची दिशा ठरवेल, असे अनेक राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येते. कर्नाटक निवडणुकीचे राजकीय महत्त्व केवळ कर्नाटकच्या राजकारणापुरते मर्यादित नसून, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जात आहे.

Karnataka Assembly Election 2023 : Narendra Modi : Amit Shah
Eknath Shinde| न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया: मी नाही....

विशेष म्हणजे, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा बहुमत सरकर स्थापन्याचे लक्ष्य ठेवले आहे. या दृष्टिकोनातूनही कर्नाटकची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची ठरते. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार निकाल लागला, तर भाजप सत्तेतून बाहेर पडेल. कर्नाटक निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर 2024 च्या निवडणुकीत आपले लक्ष्य गाठणे अवघड मानले जात आहे.

2024 मध्ये भाजपसाठी काय अडचणी असतील?

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कर्नाटकात भाजपची सत्ता गेली तर, कर्नाटकातील भाजपच्या लोकसभेच्या जागाही कमी होण्याची शक्यता आहे.जर यावेळी भाजप निवडणूक हरला तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात पक्षाच्या जागा कमी होऊ शकतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, राज्यातील लोकसभेच्या 28 जागांपैकी भाजपने 25 जागा जिंकल्या आणि त्यांच्या समर्थन दिलेल्या एका अपक्ष उमेदवाराने ही एक जागा जिंकली आहे. तर काँग्रेस आणि जेडीएसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. कर्नाटकात भाजपचा पराभव झाल्यास राज्यात 2019 च्या निकालाची पुनरावृत्ती करणे, पक्षाला कठीण होऊन काँग्रेसच्या जागा वाढू शकतात.

Karnataka Assembly Election 2023 : Narendra Modi : Amit Shah
Poor Chief Minister : देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण?, आकडेवारी आली समोर..

भाजप या नुकसानीची भरपाई करू शकेल का :

कर्नाटकाबरोबरच पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, महाराष्ट्रातही भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. या राज्यांतील जागांचा तोटा भरून काढण्यासाठी भाजपला नवीन राज्ये शोधावी लागतील, जी जवळपास शक्य वाटत नाही.

पाच राज्यांत १७२ जागा:

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने लोकसभेच्या जागा बंगालमध्ये ४२ पैकी १८, महाराष्ट्रात ४८ पैकी २३, कर्नाटकात २८ पैकी २५, बिहारमध्ये ४० पैकी १७, झारखंडमध्ये १४ पैकी १२ जागा जिंकल्या. पाच राज्यांतील एकूण 172 जागांपैकी भाजपने स्वबळावर 98 जागा जिंकल्या होत्या, तर त्यांच्या मित्रपक्षांना 42 जागा मिळाल्या जिंकल्या होत्या. अशा प्रकारे 172 पैकी 140 जागांवर भाजप आघाडीने विजय मिळवला होता.

Karnataka Assembly Election 2023 : Narendra Modi : Amit Shah
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची आमदारकी गेली तरी मुख्यमंत्रीपदावर तेच राहू शकतात? राहुल नार्वेकरांचे सूचक वक्तव्य

भाजपचे समीकरण बिघडले :

महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलली आहेत. 2019 मध्ये भाजपसोबत युती करून निवडणूक लढवणारी शिवसेना ठाकरे गट आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीत आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना साथ दिली मात्र मूड ऑफ नेशनच्या एका सर्वेक्षणात महाविकास आघाडीला ४८ पैकी ३४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच बिहारमध्ये नितीश कुमार आता महाआघाडीत परतले आहेत, त्यामुळे बिहारमध्येही भाजपचे नुकसान होऊ शकते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर भाजपचे समीकरण बिघडले असून, त्यांचे सर्व नेते टीएमसीमध्ये सामील होत आहेत.

Karnataka Assembly Election 2023 : Narendra Modi : Amit Shah
Harish Salve on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर..; सत्तासंघर्षावर हरीश साळवेंचा मोठा खुलासा!

मिशन-दक्षिणला झटका :

दक्षिणेमध्ये आंध्र प्रदेश, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये भाजपला अद्याप स्वतःला पाय रोवता आले नाही. दक्षिणेकडील सहा राज्यांमध्ये लोकसभेच्या 130 जागा आहेत, ज्या एकूण लोकसभेच्या जागांपैकी सुमारे 25 टक्के आहेत. अशा परिस्थितीत दक्षिण भारत राजकीयदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे. 2019 मध्ये, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये भाजपला जागा मिळाल्या, परंतु उर्वरित दक्षिणेकडील राज्यांमध्ये जागा मिळाल्या नाहीत. कर्नाटकच्या माध्यमातून भाजपला दक्षिणेत पाय रोवायचे आहेत, मात्र कर्नाटकातच धक्का बसला तर तेलंगणा, आंध्र प्रदेशसह इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठा राजकीय फटका बसू शकतो.

Karnataka Assembly Election 2023 : Narendra Modi : Amit Shah
Harish Salve : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सत्ता राखणाऱ्या हरीश साळवेंची दिवसाची कमाई किती ?

अखिल भारतीय पक्ष प्रतिमेला धक्का :

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, तर दक्षिण भारतातून भाजपचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो. अशा स्थितीत भारतभर पसरलेला राष्ट्रीय पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भाजपलाही कर्नाटकातील पराभवाचा फटका बसू शकतो. भाजपला स्वबळावर दक्षिणेतील राज्यांपैकी केवळ कर्नाटकातच आपली मुळे रोवता आली आहेत. कर्नाटक वगळता दक्षिणेकडील कोणत्याही राज्यात भाजपचा फारसा प्रभाव नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com