Gayathri Shantegowda Sarkarnama
देश

Cabinet expansion : फेरमतमोजणीत आमदारकी मिळालेल्या महिला नेत्याला मंत्रि‍पदाची हुलकावणी; अखेरच्या क्षणी मंत्रिमंडळ विस्तारातून वगळलं नाव

Gayathri Shantegowda, DK Shivakumar, Karnataka ministers list : कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारात एकही महिला मंत्री नसल्याने विरोधकांचा हल्लाबोल; शांतगौडा यांचे नाव यादीतून काढल्याने काँग्रेसच्या महिला सक्षमीकरणाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह.

Rajanand More

Congress Politics : कर्नाटक सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी २० आमदारांची यादी मंत्रि‍पदाच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना पाठविली होती. या यादीमध्ये एका महिला आमदाराचे नावही होते. पण प्रत्यक्ष शपथविधीवेळी त्या अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. अखेर त्यांच्याशिवाय १९ मंत्र्‍यांचाच शपथविधी पार पडला.

नेमकं काय घडलं?

काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिल्लीतून पाठवलेल्या यादीमध्ये आमदार गायत्री शांतगौडा यांच्याही नावाचा समावेश होता. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली आहे. विधानपरिषदेच्या २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता. पण त्यांनी या निकालाला हायकोर्टात आव्हान दिले होते. कोर्टाच्या आदेशानुसार फेरमतमोजणी झाली असून शांतगौडा यांचा विजय झाला. काही दिवसांपूर्वी या निकालावर सुप्रीम कोर्टानेही शिक्कामोर्तब केले.

गायत्री शांतगौडा यांना दीड वर्षांसाठी आमदारकी मिळाली अन् लगेचच मंत्रि‍पदाची माळही त्यांच्या गळ्यात पडणार होती. यादीत त्यांचे नावही होते. पण शपथविधी सोहळा सुरू झाल्यानंतरही त्या व्यासपीठावर आल्या नाहीत. त्यामुळे चर्चांना उधाण आले. अखेर उर्वरित १९ मंत्र्‍यांचाच शपथविधी झाला. शांतगौडा यांचे नाव ऐनवेळी यादीत वगळण्यात आल्याची माहिती समोर आली. तांत्रिक घोळ झाल्याचा दावा नेत्यांकडून करण्यात आला. शांतगौडा यांच्यासाठी हा मोठा धक्का होता.

एकही महिला मंत्री नाही

शांतगौडा यांना शपथविधी झाला असता तर त्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री ठरल्या होत्या. पण आता ३३ मंत्र्‍यांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. एकीकडे काँग्रेसकडून महिलांसाठी विविध योजना राबविल्या जात असताना एकही मंत्री नसल्याने पक्ष बॅकफूटवर आला आहे. मुख्यमंत्री शिवकुमार यांनी पुढील काळात महिलांना संधी दिली जाईल, असे म्हटले आहे. सिध्दरामय्या यांच्या मंत्रिमंडळातही एकच महिला मंत्री होत्या.

कर्नाटकात महिला नेत्या दुर्लक्षित

कर्नाटकात महिलांना विधानसभा निवडणुकीतही फारशी संधी मिळत नाही. २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकात २२४ जागांपैकी काँग्रेसने केवळ ११ जागांवर तर भाजपने १२ जागांवर महिला उमेदवार दिल्या होत्या. त्यापैकी अनुक्रमे चार आणि तीन महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. २०१८ च्या निवडणुकीतही फारशी वेगळी स्थिती नव्हती. पण शांतगौडा यांचे नाव शेवटच्या क्षणी वगळल्याने राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT