Reel controversy : रील पडली महागात, शिक्षिकेला सोडावी लागली सरकारी नोकरी; निलंबनानंतर ट्रोल, रडत-रडतच दिला राजीनामा

Bhukya Gautami, government teacher : सरकारी शाळेतील इंग्रजी शिक्षिका भुक्या गौतमी यांना रील्समधून खासगी शाळेचे प्रमोशन केल्याचा ठपका; निलंबन, ट्रोलिंग आणि मानसिक छळानंतर व्हिडिओतून राजीनाम्याची घोषणा.
Bhukya Gautami
Bhukya GautamiSarkarnama
Published on
Updated on

Teacher resignation : नोकरीच्या ठिकाणी रील्स बनवून सोशल मीडियात व्हायरल करणाऱ्या रीलस्टरची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सरकारी नियमांचे उल्लंघन करत अनेकजन बिनदिक्कतपणे रील्स बनविण्याचे प्रकार घडतात. यामध्ये देशभरातली अनेक शिक्षकही आहेत. अशाच एका शिक्षिकेला सरकारने दणका दिला आहे. सरकारी शाळेत नोकरीला असतानाही रील्समधून खासगी शाळेचे प्रमोशन केल्याचा ठपका ठेवत या शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे.

तेलंगणामध्ये ही घटना घडली आहे. भुक्या गौतमी असे या शिक्षिकेचे नाव असून त्यांनी नुकतीच एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्याचे सांगितले. सरकारने त्यांना यावर्षाच्या सुरूवातीलाच निलंबित केले होते. त्यानंतर त्या सोशल मीडियात ट्रोल झाल्या. अनेकांनी टीका केली. हा अपमान सहन होऊ न शकल्याने आपण नोकरीचा राजीनामा दिल्याचे गौतमी यांनी सांगितले.

भुक्या गौतमी या ममिललागुडेम हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाच्या सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सोशल मीडियात पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, निलंबन मागे घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा पोस्टिंग मिळाली, पण जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडून खूप अपमान करण्यात आला, मानसिक छळ सहन करावा लागला.

Bhukya Gautami
Modi Government : संसदेत 2 आठवडे शांत, PM मोदी-शहांचा नक्की प्लॅन काय? 5 ऑगस्ट ठरणार गेमचेंजर?

ज्या रील वरून आपला विरोध होत आहे, ती शाळेच्या वेळेत बनविली नव्हती. घरामध्ये रेकॉर्ड केली होती. अध्यापनामध्ये कोणताही निष्काळजीपणा केला नाही. मागील १२ वर्षांपासून पूर्ण क्षमतेने काम केले. आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासी कुटुंबातील आहोत. मी शिक्षिका बनावे, यासाठी आई-वडिलांनी खूप कष्ट घेतले. गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी माजा नेहमीच प्रयत्न राहिलला असल्याचे गौतमी म्हणाल्या.

Bhukya Gautami
Cabinet expansion : विधानसभेचे अध्यक्षपद पाटलांकडे, 20 आमदारांना मंत्रिपदाची संधी; महाराष्ट्राशेजारील राज्यात काँग्रेसची खेळी

नियमित अध्यापनासोबतच आपल्या विद्यार्थ्यांसाठी खासगी इंग्रजीचे वर्गही घेत असल्याचे गौतमी यांनी सांगितले. पण प्रामाणिक आणि कष्टाळू शिक्षकांना या व्यवस्थेत जागा दिसत नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी रडत रडतच म्हटले. दरम्यान, गौतमी यांचे सोशल मीडियात लाखो फॉलोअर्स असून त्यांनी हजारो व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com