Basavraj Bommai and Navin Shekharappa  Sarkarnama
देश

युक्रेनमध्ये बळी गेलेल्या विद्यार्थ्याचे कुटुंबीय कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती

रशिया-युक्रेन युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याचा बळी गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना तेथून भारतात आणण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. यातच आता युद्धात नवीन शेखरप्पा (Navin Shekharppa) या भारतीय विद्यार्थ्याचा बळी गेला आहे. नवीनचे कुटुंबीय हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांचे निकटवर्तीय होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच याची कबुली दिली आहे. (Indian Student Killed in Ukraine)

नवीन याच्या मृत्यूबाबत बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, मी त्याच्या कुटुंबाला ओळखतो. ते माझे अतिशय निकटवर्तीय आहे. त्याच्या कुटुंबीयांशी फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. त्याचे पार्थिव भारतात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मी यासाठी पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे मदतीची विनंती केली आहे.

खारकीव्ह येथे आज सकाळी बॉम्बहल्ल्यात नवीन शेखरप्पा भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही अतिशय दु:खदायी घटना आहे. या मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात परराष्ट्र मंत्रालय आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांशी संपर्क साधला. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तेथून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली आहे. याचप्रकारची मागणी भारताच्या रशिया आणि युक्रेनमधील राजदूतांनीही केली आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली.

युक्रेनची (Ukraine) राजधानी कीव्हमधून (Kyiv) तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन भारतीय दूतावासाकडून (Indian Embassy) अडकलेल्या भारतीय नागरिकांना करण्यात आले आहे. मिळेल त्या वाहनाने कीव्ह सोडा, असं दूतावासाकडून स्पष्ट करण्यात आल्यानं भीती वाढत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाला (Indian Air Force) आदेश दिले आहेत. कीव्हमध्ये रशियाकडून (Russia) हल्ला केला जाण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. अजूनही अनेक विद्यार्थी कीव्हमध्ये अडकले आहेत. पण दूतावासाच्या आवाहनामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या भारतातील कुटुंबीयांचीही चिंता वाढली आहे. मागील सहा दिवसांपासून केंद्र सरकाकडून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एअर इंडिया व इतर खासगी विमान कंपन्यांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास दीड हजार नागरिक परत आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT