Karnataka Congress crisis Sarkarnama
देश

Karnataka Politics : सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात? काँग्रेसमध्ये बदलाच्या चर्चा पुन्हा तेजीत, शिवकुमारांची ताकद वाढली

karnataka cm change controversy : कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा नव्याने सुरू झाली असून आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

Aslam Shanedivan

  1. ईडिगा समाजातील स्वामींनी डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे.

  2. सुमारे 15 स्वामी दिल्लीला जाऊन काँग्रेस नेतृत्वाकडे मागणी करणार आहेत.

  3. सिद्धरामय्या यांच्यावर समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

congress leadership controversy : अर्थसंकल्पीय अधिवेशन तसेच आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना ब्रेक लागला होता. पण आता मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना अधिक वेग आला असून कर्नाटकातील ईडिगा या मोठ्या समाजाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात समाजासाठी भरीव तरतूद केली नाही असा दावा केला आहे. तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री करावे अशी मागणी केली आहे. तर या मागणीसाठी सुमारे १५ स्वामींजी लवकरच दिल्लीला जाऊन काँग्रेस नेतृत्वाची भेट घेतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले असून, त्यांच्या मेहनतीचे योग्य फलित म्हणून त्यांना लवकरात लवकर मुख्यमंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी ईडिगा समाजाचे प्रणवानंद स्वामीजी यांनी केली आहे.

शिवकुमार यांची भेट घेतल्यानंतर स्वामीजींनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करणाऱ्या मठांना यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही मदत दिलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, राज्यातील मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा सध्या थंडावलेला असल्याचे दिसत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना तसेच आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या या विषयावर कोणतीही चर्चा नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याच काळात ईडिगा समाजातील प्रमुख मठाधीशांनी शिवकुमार यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला आहे.

स्वामीजींनी पुढे आरोप केला की, ‘आमच्या समाजाच्या कोणत्याही मागण्या सिद्धरामय्या यांनी पूर्ण केल्या नाहीत. आम्ही शिवकुमार यांना पाठिंबा दिल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष केले. मे महिन्यात बंगळुरातील पॅलेस ग्राउंडवर विविध मठाधीशांची मोठी बैठक आयोजित करण्याचा निर्णय झाला आहे. या संदर्भात शिवकुमार यांची भेट घेऊन तारीख निश्चित केल्याचेही त्यांनी सांगितले.

१५ स्वामीजी घेणार हायकमांडची भेट

मुख्यमंत्र्यांच्या बाजूने बोलणाऱ्या स्वामीजींना मात्र जमीन दिली, तर आमच्यासारख्या गरीब स्वामीजींना लक्ष्य करण्यात आले, असा आरोप करत स्वामीजींनी सांगितले की, सुमारे १५ स्वामींजी लवकरच दिल्लीला जाऊन काँग्रेस नेतृत्वाकडे शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करणार आहेत.

‘सिद्धरामय्या यांनी इतरांना संधी द्यावी’

सिद्धरामय्या यांनी यापूर्वी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. आता त्यांनी इतरांना संधी द्यावी. त्यांनी काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचेही सांगितले. दरम्यान, या सर्व घडामोडींवर शिवकुमार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

FAQs :

1. कर्नाटकात CM बदलाचा मुद्दा का चर्चेत आहे?
ईडिगा समाजाने डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे.

2. कोण दिल्लीला जाणार आहेत?
ईडिगा समाजातील सुमारे 15 स्वामी दिल्लीला जाणार आहेत.

3. सिद्धरामय्या यांच्यावर काय आरोप आहेत?
समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्याचा आरोप आहे.

4. डीके शिवकुमार यांना कोणाचा पाठिंबा आहे?
ईडिगा समाजाचा त्यांना पाठिंबा मिळत आहे.

5. पुढे काय होऊ शकते?
काँग्रेस नेतृत्वाकडून या मागणीवर निर्णय घेतला जाऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT