D. K. Shivakumar & Siddaramaiah Sarkarnama
देश

Karnataka CM : संकटमोचकामुळेच काँग्रेस संकटात; शिवकुमार यांच्यामागे 100 आमदार, कर्नाटकात खळबळ...

CM Change Buzz Grips Karnataka Politics : डी. के. शिवकुमार यांच्यामागे काँग्रेसचे 100 हून अधिक आमदार असल्याचा दावा समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यावर टांगती तलवार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Rajanand More

DK Shivakumar Emerges as Strong Contender : कर्नाटक काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे दाखविले जात असले तरी अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम लागण्याची सूतराम शक्यता सध्यातरी दिसत नाही. त्यामध्ये आता उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या समर्थक आमदारांनी खळबळ उडवून दिली आहे.

शिवकुमार यांच्यामागे काँग्रेसचे 100 हून अधिक आमदार असल्याचा दावा समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यावर टांगती तलवार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यात पुढील काही महिन्यांत परिवर्तन होणार असल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी नेतृत्व बदलाच्या चर्चांबाबत हायकमांडकडे बोट दाखवून परिवर्तनाच्या मुद्द्याला हवा दिली आहे.

काँग्रेसचे आमदार इक्बाल हुसैन हे मागील काही दिवसांपासून नेतृत्व बदलाचे संकेत देणारी विधाने करत आहेत. केवळ मीच नाही तर 100 हून अधिक आमदारांना बदल हवा आहे. अनेकजण या क्षणाची वाट पाहत आहे. त्यांना सुशासन हवे आहे. शिवकुमार यांना एक संधी मिळायला हवी, असे त्यांना वाटते. त्यांनी पक्षासाठी अथकपणे काम केले आहे. संघटना मजबूत करण्यात त्यांची भूमिका महत्वाची आहे, असे हुसैन म्हणाले आहेत.

कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष जाल्यानंतर पक्षाचे नशीब पालटल्याचे सगळ्यांनी पाहिले आहे. त्यांच्या प्रय़त्नांमुळे अधिकाधिक लोकांचे समर्थन त्यांना मिळत आहे, असे हुसैन म्हणाले होते. दरम्यान, सिध्दरामय्या यांनी शुक्रवारी या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. तुम्ही अंदाज व्यक्त करणाऱ्या बातम्या देत असाल तर त्यावर काय केले जाऊ शकते. त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल, असे सांगत त्यांनी थेट बोलणे टाळले होते.

सहकार मंत्री के. एन. राजन्ना यांनीही राज्यात अनेक सत्ता केंद्र असल्याची टीका काही दिवसांपूर्वीच केली होती. कर्नाटकात 2013-18 यादरम्यान सत्तेचे केवळ एकच केंद्र होते. आता अनेक आहेत, एक, दोन, तीन, असा राजन्ना म्हणाले होते. तसेच अन्य काही नेत्यांनीही नेतृत्व बदलाबाबत उघडपणे भाष्य केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT