
Trump Musk conflict : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्वाकांक्षी ‘One Big, Beautiful Bill’ या विधेयकाविरोधात अब्जाधीश उद्योजक इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा विरोधाची तलवार उपसली आहे. मागील 12-13 तासांपासून या बिलावर मतदान सुरू असून या दरम्यान मस्क यांनी टोकाचा विरोध करत ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
ट्रम्प यांनी सकाळीच मस्क यांच्यावर निशाणा साधणारी पोस्ट सोशल मीडियात केली आहे. राष्ट्रपती बनण्यासाठी मदत कऱण्याआधीपासून मस्क यांना माहिती होते की, मी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांचा विरोधक आहे. ही वाहने विकत घेण्यासाठी प्रत्येकाला बंधन घालू शकत नाही, असे स्पष्ट करत ट्रम्प यांनी एकप्रकारे मस्क यांच्या टेस्ला कारवर फुली मारली आहे.
मानवी इतिहासात मस्क यांना सर्वाधिक अनुदान मिळू शकते, पण अनुदानशिवाय त्यांना कदाचित त्यांना आपले दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल. एवढे रॉकेट लॉन्चर, सॅटेलाईट किंवा इलेक्ट्रिक कारचे उत्पादन होणार नाही आणि आमचे खूप सारे पैसेही वाचतील, असा गर्भित इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प एवढ्यावर थांबले नाहीत. मस्क यांना मिळालेले सरकारी अनुदान आणि कॉन्ट्रॅक्टची DOGE पडताळणी करून त्याला कात्री लावायला हवी. खूप पैसे वाचतील, असेही ट्रम्प म्हणाले आहेत. मस्क यांनी बिग ब्यूटिफूल बिलाला जोरदार विरोध केला आहे. हे बिल संसदेत पारित झाले तर अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष बनविण्याचे संकेत त्यांनी दिले आहे. त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर मतदानही घेतले होते. त्याला जोरदार प्रतिसादही मिळाला आहे.
मस्क यांच्या म्हणण्यानुसार, या बिलामध्ये देशावरील कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. हे कर्ज 2.4 ट्रिलियन डॉलर कर्ज असून ते पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढू शकते. त्यामुळे बजेटमधील तुट वाढेल. अमेरिकेतील नागरिकांवरील अतिरिक्त बोझा वाढणार आहे. विशेष म्हणजे या बिलामध्ये इलेक्ट्रिक वाहन टॅक्स क्रेडिट आणि स्वच्छ ऊर्जा प्रोत्साहन अनुदान बंद करण्याची तरतूद आहे. त्याचा फटका थेट मस्क यांच्या टेस्ला कंपनीला बसणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.