Karnataka Congress  Sarkarnama
देश

Karnataka Congress : कर्नाटकमध्ये राजकीय उलथापालथ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, राहुल गांधींना भेटणार

Karnataka CM Siddaramaiah and DCM DK Shivakumar to Meet Rahul Gandhi in Delhi : कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज, तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मंगळवारीच दिल्लीला रवाना झाले आहेत.

Pradeep Pendhare

Karnataka CM DCM Delhi tour : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नवी दिल्ली दौऱ्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठका आणि चर्चांना उधाण आले आहे.

परदेश दौऱ्यावरून परतलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या सोबतच्या या दोन्ही नेत्यांच्या भेटींना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

कर्नाटक राज्यातील काँग्रेस (Congress) सरकारच्या कारभारावर नाराज असलेल्या आमदारांना शांत करण्यासाठी प्रदेश काँग्रेस प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांनी सर्व आमदारांसोबत स्वतंत्र बैठक घेतली, तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज दिल्लीला रवाना होतील. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मंगळवारीच दिल्लीला रवाना झाले आहेत.

उपमुख्यमंत्री शिवकुमार केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्यासह काही मंत्र्यांना भेटतील. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज सकाळी दिल्लीला रवाना होतील. सायंकाळी भाजपचे (BJP) केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना भेटतील. गुरुवारी हे दोन्ही नेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांना भेटतील आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा करतील.

सिद्धरामय्या यांचे राष्ट्रीय राजकारण

एआयसीसीच्या ओबीसी सल्लागार परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्त झालेले सिद्धरामय्या यांनी राष्ट्रीय राजकारणात रस नसल्याचे म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांकडे त्यांच्या मनातील भावना उघड केल्याचे वृत्त आहे. मी पूर्वी राष्ट्रीय राजकारणात गेलो नाही, मग मी आता का जाऊ? असे त्यांचे म्हणणे असल्याचे समजते. राष्ट्रीय पातळीवर पक्षासाठी काम करण्याचे आता माझे वय नाही. मी राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. राज्यातील सार्वजनिक जीवन सन्मानाने संपवण्याचा मानस सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे.

नाराज आमदारांची संख्या 40वर

राज्य सरकारवर नाराज असलेल्या कर्नाटक राज्यातील काँग्रेस आमदारांना शांत करण्यासाठी प्रदेश काँग्रेस प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांनी दोन दिवस 40 नाराज आमदारांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी कोणत्याही आमदाराने पक्ष अडचणीत येईल, असे जाहीर वक्तव्य करू नये, अशी ताकीदही दिली आहे. उघडपणे बोलू नका. कारण त्यामुळे विरोधी पक्षांना टीका करण्यास हत्यार मिळेल. आम्ही सर्व समस्यांवर उपाय शोधण्यासाठी काम करू, असे ठासून सांगितले आहे. यावर दिल्लीत राहुल गांधी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

मंत्र्यांविरोधात तक्रारींचा महापूर

सूरजेवाला यांच्याकडे बेळगाव आणि विजापूर जिल्ह्यातील आमदारांकडून काही मंत्र्यांविरुद्ध तक्रारी आल्या आहेत. ज्यात काही मंत्री त्यांचे काम करत नसल्याची तक्रार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या आमदारांच्या बैठकीत अनेक आमदारांनी काही मंत्र्यांविरुद्ध तक्रारींचा महापूर आणला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT