
BJP fake documents controversy : महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाच्या बनावट कामांचा काढलेल्या आदेशावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
"हे बनावट आदेश म्हणजे, भाजपचा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याच्या षड्यंत्राचा भाग आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने बोगस मतदान निर्माण केले तसेच बनावट कामे मंजूर करून निवडणुकीवर प्रभाव टाकला. या बनावट आदेशाच्या षड्यंत्रात आपल्या मतदारसंघातील विद्यमान आमदारांचा सहभाग स्पष्ट होतो ", असा घणाघात प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) राज्याच्या बनावट ग्रामविकास मंत्रालयाच्या नावाने अहिल्यानगर इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवण्यात आलेला सात कोटींच्या खर्चाचा आदेश पाठवण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यात 6 कोटी 94 लाख रुपये खर्चाची कामेही सुरू करण्यात आली आहेत. अशा बनावट आदेशाचा आमदारासह मंत्र्यांना देखील दणका बसला आहे. यावरून राज्यात गोंधळ सुरू असून, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्राजक्त तनपुरे म्हणाले, "बनावट आदेश ही गंभीर बाब आहे. भाजपने (BJP) बोगस मतदार निर्माण केले तसेच बनावट कामे मंजूर करून निवडणुकीवर प्रभाव टाकला. त्यामुळे बनावट कामांच्या आदेशाचा गुन्हा दाखल करून त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे की नाही, याची चौकशी झाली पाहिजे".
'या बनावट आदेशात भाजपचे आमदार, ग्रामविकास मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे संगनमत स्पष्ट होतं. आपल्या मतदारसंघातील बुऱ्हाणनगर इथल्या कामांचाही त्या बनावट आदेशात समावेश असल्याने विद्यमान आमदारांचाही बनावट आदेशच्या षड्यंत्रात सहभाग स्पष्ट होतो', असा आरोपही प्राजक्त तनपुरे यांनी केला.
भाजपने गेल्या अडीच वर्षात अधिकाऱ्यांवर दबाव टाकून असे अनेक प्रकार केले आहेत. चुकीची कामे मंजूर केली आहेत. कुठेतरी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा यात संगनमत दिसतो आहे. त्याशिवाय असे प्रकार उडू शकत नाही, असेही प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.