कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेमुळे सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार गटांमध्ये तणाव वाढला आहे.
सिद्धरामय्या यांनी आपण काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसार काम करू असे स्पष्ट केले आहे.
डी. के. शिवकुमार यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे नेतृत्व बदलाच्या हालचालींना वेग आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
bengaluru News : कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत असून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उत आला आहे. अशातच मुख्यमंत्री सिद्धारमय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात जोरदार ओढाताण सुरू असतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे सूचक वक्तव्ये समोर येत आहेत. यामुळे नव्याने मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू आहे. सिद्धरामय्या यांनी आपण काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसारच काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपली ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी देखील दिल्ली दौऱ्याबाबत सूचक वक्तव्य केल्याने कर्नाटकात
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी (ता. १०) विधानसौध येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी पक्षांतर्गत घडामोडींवर सूचक ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘मी कोणाच्या पाठीमागे काहीही बोललेलो नाही. थेट हायकमांडशीच बोललो आहे. त्या चर्चेचा तपशील जाहीर करणार नाही. हायकमांड जे सांगेल, त्यानुसारच वागेन. दिल्लीला मला बोलावले नसेल तर मी का जाऊ? सध्या अर्थसंकल्पपूर्व बैठक सुरू आहे. हायकमांडने बोलावले, तर नक्की जाईन. हायकमांडच्या निर्देशानुसारच आपण काम करू असेही ते म्हणाले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे अर्थसंकल्पपूर्व तयारीच्या बैठकीला अनुपस्थित होते. याबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, शिवकुमार यांनी अनुपस्थितीसाठी परवानगी मागितली होती. ‘त्यांनी पत्र लिहून कळवले आहे की, आसाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते दिल्लीला जात आहेत.’
माजी खासदार प्रताप सिम्हा यांनी विधान परिषद सदस्य यतींद्र सिद्धरामय्या यांच्या कथित हस्तक्षेपावर टीका केल्यानंतर, त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘भाजपनेच त्यांच्या पक्षातील प्रताप सिम्हा यांना तिकीट दिलेले नाही. त्यामुळे इतरांवर टीका करण्याआधी त्यांनी आत्मपरीक्षण करावे.’’
दरम्यान, सिद्धरामय्या यांनी विधानसौधच्या पश्चिम बाजूस असलेल्या दिवंगत माजी मुख्यमंत्री केंगाल हनुमंतय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. ‘केंगाल हनुमंतय्या हे अत्यंत प्रामाणिक, धाडसी आणि दूरदृष्टी असलेले राजकारणी होते. राज्यहिताचा विचार करून त्यांनी निर्णय घेतले. भव्य आणि सुंदर विधानसौध उभारण्याचे श्रेय त्यांनाच जाते. त्यांनी कर्नाटक एकीकरण चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. केंद्रीय रेल्वेमंत्री तसेच प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘सर्वांनी आपले तोंड बंद ठेवले तर बरे होईल,’ असे म्हटले आहे. तो सल्ला पाळला पाहिजे, असे शिवकुमार यांनी स्पष्ट केले. सदाशिवनगर येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ पत्रकारांशी बोलताना त्यांनी सत्ता वाटपावरून सुरू असलेल्या नेत्यांच्या विधानांवर नाराजी व्यक्त केली.
शिवकुमारांचे सूचक वक्तव्य
शिवकुमार यांनी दिल्ली दौऱ्याबाबत सूचक वक्तव्य केले. ज्यांनी आपल्याला दिल्लीला बोलावले आहे, त्यांना भेटत आहे. माझे कष्ट, दुःख, तक्रारी, आनंद आणि अपेक्षा त्यांच्याशी मोकळेपणाने मांडणार आहे.
1. कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची चर्चा का सुरू झाली आहे?
काँग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी वाढल्यामुळे आणि नेतृत्व बदलाच्या संकेतांमुळे ही चर्चा सुरू आहे.
2. सिद्धरामय्या यांची भूमिका काय आहे?
त्यांनी स्पष्ट केले आहे की ते काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसारच काम करतील.
3. डी. के. शिवकुमार यांचा दिल्ली दौरा का महत्त्वाचा मानला जातो?
दिल्ली दौऱ्यामागे नेतृत्व बदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने त्याला राजकीय महत्त्व आहे.
4. काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेऊ शकते?
हायकमांड पक्षातील परिस्थिती पाहून नेतृत्व कायम ठेवणे किंवा बदल करण्याचा निर्णय घेऊ शकते.
5. या घडामोडींमुळे कर्नाटक सरकारवर काय परिणाम होऊ शकतो?
नेतृत्व बदल झाल्यास राज्यातील सत्तासंतुलन आणि पक्षातील समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.