Karnataka politics controversy : कर्नाटकमधील काँग्रेस मुख्यमंत्री सिद्धरामय्या अन् उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे पुन्हा लक्झरी घड्याळाच्या वादात सापडले आहेत. हुबलॉट घड्याळामुळे 2016 मध्ये त्यांच्याभोवती मोठा वाद निर्माण झाला होता.
आता कार्टियर ब्रँडच्या घड्याळाने पुन्हा दोघं वादात सापडली आहे. कर्नाटकमधील मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये रस्सीखेच आहे. यातच दोघांनी ‘नाश्ता डिप्लोमसी’ बैठक घेतली. या बैठकीचे फोटो अन् व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले. या बैठकीत दोघांनी घातलेल्या ‘जुळत्या घड्याळांची’ चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्रिपदी संभाव्य बदल आणि काँग्रेसमधील (Congress) सिद्धरामय्या-शिवकुमार यांच्यातील सुरू असलेल्या रस्सीखेचीत हायकमांडने तात्पुरता तोडगा काढला. दोन्ही नेत्यांची सलोखा राखण्यासाठी गेल्या काही दिवसांत दोनदा नाश्त्याच्या बैठका झाल्या. या बैठकींमधून दोन्ही नेते एकतेचा संदेश देत असतानाच त्यांच्या हातातील एकाच कंपनीचे, एकाच मॉडेलचे घड्याळ हे राजकीय चर्चेचे नवीन केंद्र ठरले आहे.
मीडिया फुटेजमध्ये दोन्ही नेत्यांनी कार्टियर ब्रँडचे समान दिसणारे घड्याळ परिधान केल्याचे दिसल्याने अफवांना जोर आला. दोघांनी एकता दाखवण्यासाठी मुद्दाम एकसारखे घड्याळ घातले का? असा सवाल सोशल मीडियावर (Social Media) केला जात आहे. या घड्याळाची किंमत कार्टियरच्या वेबसाइटनुसार सुमारे 43 लाख रुपये असल्याचा दावा केला जातो.
घड्याळ सँटोस डे कार्टियर या उच्च श्रेणीच्या एडिशनमधील असल्याचे म्हटले जाते. या मॉडेलच्या खास वैशिष्ट्यांमध्ये सोन्य-चांदीचा वापर, 750/1000 सूक्ष्मता असलेले केस-गोल्ड, सिल्व्हर ओपलाइन डायल, अचूक कारागिरी आणि लक्झरी फिनिश ही या मालिकेची वैशिष्ट्ये ठरतात. ही वैशिष्ट्ये आणि उच्च बाजारभाव लक्षात घेता हे घड्याळ लक्झरी श्रेणीत मोडते.
भाजपने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. पक्षाने ‘एक्स’वर टीका करताना म्हटले आहे की, ‘‘पूर्वी 70 लाखांचे घड्याळ होते. आता 43 लाखांचे. मनगटी घड्याळ बदलले. पण, समाजवादी मानसिकता बदलली नाही. समाजवादाचा मुखवटा घालून आलिशान जीवन जगणाऱ्या सिद्धरामय्या हा तुमचा सामाजिक न्याय आहे का? भाजपच्या या प्रश्नांमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.