PMO: मोदींचा ऐतिहासिक निर्णय! ७८ वर्षे जुनं कार्यालय आता ओळखलं जाणार ‘सेवा तीर्थ’

PMO Office Renamed as ‘Seva Tirth’:'सरकार सत्तेकडून सेवेकडे आणि अधिकाराकडून जबाबदारीकडे जात आहे. हे बदल केवळ प्रशासकीय नाही तर सांस्कृतिक नैतिक देखील बदल असल्याचे सरकारनं म्हटलं आहे. हा बदल सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक प्रमुख भाग आहे.
PMO Office Renamed as ‘Seva Tirth’:
PMO Office Renamed as ‘Seva Tirth’:Sarkarnama
Published on
Updated on

विविध शहरं आणि कार्यालयाचे नाव बदलण्याचा सपाटा मोदी सरकारने लावला आहे. याच मोहीमेत मोदी सरकारनं प्रशासनातील दोन मोठ्या कार्यालयाचे नाव बदलले आहे. पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) नाव बदलण्यात आले असून पीएमओ कार्यालय आता ‘सेवा तीर्थ’ म्हणून ओळखले जाणार आहे.

या निर्णयाबरोबरच केंद्र सरकारने सार्वजनिक संस्थांमध्ये एका मोठ्या संस्थेचे नाव बदलले आहे. देशभरातील राजभवन आता 'लोक भवन' म्हणून ओळखले जाणार आहे. पीएमओ (पंतप्रधान कार्यालय) आता त्याच्या ७८ वर्षे जुन्या साउथ ब्लॉकमधून 'सेवा तीर्थ' नावाच्या नवीन अत्याधुनिक कॅम्पसमध्ये शिफ्ट होत आहे. त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.

'सरकार सत्तेकडून सेवेकडे आणि अधिकाराकडून जबाबदारीकडे जात आहे. हे बदल केवळ प्रशासकीय नाही तर सांस्कृतिक नैतिक देखील बदल असल्याचे सरकारनं म्हटलं आहे. हा बदल सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक प्रमुख भाग आहे.

‘सेवा तीर्थ’ मध्ये PMO कार्यालयाबरोबरच केंद्रीय सचिवालय, इंडिया हाउस, राष्ट्रीय संरक्षण सल्लागार सचिवावलय आदी विभाग असणार आहेत. सेवा तीर्थ हे असे कामाचे ठिकाण असेल त्या ठिकाणी सेवेचे भावना असेल, अशा प्रकारे हे बांधण्यात आले आहे.

PMO Office Renamed as ‘Seva Tirth’:
EPFO च्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मिळणार 45 हजार रुपयांचा फायदा

लवकरच साउथ ब्लॉक मधील जुने पीएमओ नवीन सेवा तीर्थ परिसरात हलवविण्यात येणार आहे. नवीन पीएमओ सेवा तीर्थ-1 परिसरात असणार आहे, तर सेवा तीर्थ-1 परिसरात कँबिनेय सचिवालय, सेवा तीर्थ-3 राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार(एनएसए) यांचे कार्यालय असेल.

मोदी पंतप्रधान झाल्यापासून विविध ऐतिहासिक ठिकाणांची नावे बदलण्यात येत आहेत. 2022मध्ये राजपथचे नाव बदलून कर्तव्य पथ असे ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या मते, हा मार्ग अधिकार नाही, तर एक कर्तव्य आहे, असा संदेश देण्यात येत आहे. यापूर्वी 2016 मध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे नावही बदलण्यात आले होते.पूर्वी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाचे नाव रेसकोर्स रोड असे होते, परंतु 2016 मध्ये ते लोक कल्याण मार्ग असे बदलण्यात आले.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचे कार्यालयाच्या नावातून 'राज'हा शब्द हटविण्यात आला आहे.पश्चिम बंगाल, तमिलनाडु, केरळ, आसाम, उत्तराखंड, ओडिशा, गुजरात आणि त्रिपुरा च्या ‘राजभवन’चे नाव बदलून ‘लोकभवन’ करण्यात आले आहे. लडाखच्या राजभवनाचे नाव ‘लोक निवास’ असे करण्यात आले आहे. राजस्थान येथे झालेल्या राज्यपालांच्या एका बैठकीत राजभवनाचे नाव बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. ब्रिटीश सरकारच्या आठवणी संपविण्यासाठी मोदी सरकारचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com