BJP vs Congress Karnataka Sarkrnama
देश

Excise Scam : 2500 कोटींचा घोटाळा! कर्नाटक काँग्रेस सरकारची आसाम-केरळ निवडणुकांसाठी 'रसद', भाजपचा खळबळजनक आरोप

Karnataka Excise Scam: BJP Demands R B Timmapur Resignation Over 2500 Crore Allegations : कर्नाटक राज्यातील अबकारी विभागात 2500 कोटींचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केल्याने खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

BJP vs Congress Karnataka : काँग्रेस सरकार असलेल्या कर्नाटक राज्यात मोठा घोटाळा झाल्याचा दावा करत भाजपने खळबळ उडवून दिली आहे. कर्नाटक राज्यामधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा म्हणत, भाजप विरोधकांनी विधानसभेत चांगलाच गदारोळ घातला.

अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांच्याकडे असलेल्या अबकारी विभागात सुमारे 2500 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, मंत्री आर. बी. तिम्मापूर यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.

कर्नाटक (Karnataka) राज्यातील अबकारी विभागात सुमारे 2500 कोटींचा मोठा घोटाळा झाला असून, मद्य परवान्यांमधून गोळा झालेली रक्कम आसाम, केरळसह ज्या राज्यांमध्ये निवडणुक होत आहे, तिथं वापरी जाणार असल्याचा गंभीर आरोप, भाजपचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला.

विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मद्य परवान्याच्या वितरणातील घोळावर बोट ठेवत कर्नाटकमधील काँग्रेस (Congress) सरकारला चांगलच घेरलं. ठराविक नियमांचे उल्लंघन करून मद्याचे परवाने ‘लिलाव’ पद्धतीने दिले गेले. यासाठी मोठी लाच गोळा केली गेली, असा गंभीर आरोप केला.

सभापती यू. टी. खादर यांनी काँग्रेसचे आमदार ए. एस. पोन्नण्णा यांना राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव मांडण्यास सांगितल्यानंतर अबकारी घोटाळ्याचा मुद्दा सभागृहात तीव्र वादाचा विषय ठरला. या प्रकरणावर तत्काळ चर्चा घ्यावी, अशी मागणी अशोक यांनी केली. मात्र, सभापतींनी हा विषयानंतर अन्य नियमांतर्गत चर्चेसाठी घेता येईल, असे स्पष्ट केले.

तरीही अशोक आणि भाजप आमदार सुनीलकुमार यांच्या आग्रहास्तव सभापतींनी अशोक यांना विषय मांडण्याची संधी दिली. राज्यात सुमारे 2500 कोटींचा मद्याशी संबंधित घोटाळा झाला आहे. यासंदर्भात काही ऑडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत. अबकारी विभागात परवाने लिलावाने दिले जात आहेत. या प्रकरणात मंत्री आणि त्यांच्या मुलाचे नाव समोर येत आहे, असे अशोक म्हणाले.

या घोटाळासंदर्भात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. मंत्र्यांविरोधातही अधिकृत तक्रार नोंदवल्याचे त्यांनी सांगितले. ऑडिओ पुराव्यांच्या आधारे हा आरोप केला असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे यावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. काँग्रेसचे आमदार पोन्नण्णा यांना धन्यवाद प्रस्ताव मांडण्याची संधी दिली. त्यास सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रदीप ईश्वर यांनी अनुमोदन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT