

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिकेत भाजप अन् एकनाथ शिंदे शिवसेनेत युतीच्या गणितात महापौर आणि उपमहापौरपदाच्या वाटपाचा तिढा दिल्लीत सुटला असतानाच, भाजपमध्ये महापौरपद मिळवण्यासाठी लाॅबिंग सुरू झालं आहे.
भाजपकडून विविध नावे चर्चेत आहेत. तेजस्वी घोसाळकर, रितू तावडे, राजश्री शिरवडकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, रितू तावडे, आशा मराठे, शीतल गंभीर या नावांची चर्चा सुरू असली, तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितलं.
मुंबईचे (BMC Election) महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे भाजपमधील खुल्या प्रवर्गातील अनुभवी महिला नगरसेविकांत महापौरपदासाठी चुरस निर्माण झाली असून लॉबिंग सुरू झाले आहे. या पदावर कोण असेल, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेत यंदा 130 महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यात भाजपकडे (BJP) 89 पैकी 49 महिला नगरसेविका आहेत. त्यातील काही ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेविकांचा महापौरपदासाठी पक्षात विचार सुरू आहे. या पदासाठी कोणाची निवड होईल, याबाबत पक्षातही तर्कवितर्क सुरू आहे. भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन नगरसेविकांनीही लॉबिंग सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणानंतर महापौरपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता लागली आहे. भाजपकडून महापौरपदाचे दावेदार म्हणून विविध नावे चर्चेत आहेत. तेजस्वी घोसाळकर, रितू तावडे, राजश्री शिरवडकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, रितू तावडे, आशा मराठे, शीतल गंभीर या नावांची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेता पद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडे जाणार आहे. यासाठी माजी महापौर किशोर पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सत्तेतील बलाढ्य भाजपविरोधात लढण्यासाठी किशोरी पेडणेकरसारखा अनुभवी व्यक्ती शिवसेना ठाकरे सेना पक्षाने मैदानात उतरवला आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत शिवसेना ठाकरे सेना पक्षाविरुद्ध भाजप, अशी लढाई तीव्र होणार असल्याचे संकेत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.