Karnataka local body elections Sarkarnama
देश

ZP Elections : जे महाराष्ट्र सरकारला जमले नाही ते कर्नाटकने करून दाखवले; 'EVM'वरील संशयामुळे ZP निवडणूक बॅलेटवर!

Karnataka Congress Govt to Use Ballot Paper Instead of EVM in Local Elections : कर्नाटकमधील बंगळूर महापालिका, तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका मे महिन्यात होणार आहेत.

Pradeep Pendhare

Karnataka local body elections : देशभरात 'ईव्हीएम' मशीनबाबत शंका उपस्थित केली जात आहे. सर्वसाधारण मतदारांपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत, देशातील दिग्गज विरोधक, काँग्रेसला देखील 'ईव्हीएम' मशीन, मतचोरी, मतदार याद्यांच्या अद्यावतीकरासह निवडणूक आयोगाच्या एका बाजुला झुकलेल्या कारभारावर शंका आहे.

या मुळे 'ईव्हीएम'ऐवजी मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्रातही विरोधकांनी याबाबत मागणी लावून धरली होती. त्याचवेळी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या कर्नाटक राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी मतपत्रिकांचा वापर करण्याचा निर्णय तिथल्या सरकारने घेतला आहे.

कर्नाटक (Karnataka) राज्यातील आगामी बृहन बंगळूर प्राधिकरण (जीबीए) तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका मतपत्रिकेवरच घेण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जी. एस. संग्रेश यांनी दिली. बृहन बंगळूर प्राधिकरणाची प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर करण्यात आला.

आम्ही आतापर्यंत फक्त विधानसभा निवडणुकांसाठी 'ईव्हीएम'चा (EVM) वापर केला आहे. आगामी ‘जीबीए’ निवडणूक तसेच जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकाही मतपत्रिकेवरच होतील. जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणुका मे किंवा जून महिन्यात घेण्याचा आमचा विचार आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त जी. एस. संग्रेश यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका 'ईव्हीएम'ऐवजी बॅलेट पेपरवर का घेण्यात येत आहे, याचे कारण राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले नाही. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात कायद्यात कुठेही अडचण नाही, त्यामुळे या निवडणुकीत बॅलेटचा वापर होतील, एवढंच राज्य निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. बॅलेटच्या वापरावर बंदी नाही, राज्य निवडणूक आयोगाने सर्वांशी सल्लामसलत करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

राजीव गांधींचा संदर्भ

कर्नाटकमधील राज्य निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या घोषणेनंतर भाजपने यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने, 'ईव्हीएम' मशीनमध्ये छेडछाड होत असल्याबाबतचा कडाडून विरोध केला आहे. राजीव गांधी यांचा संदर्भ देताना, त्यांनीच ईव्हीएम मशीन भारतात आणले. तेव्हापासून निवडणुका ईव्हीएम होत आहेत.

काँग्रेसचा पराभव स्पष्ट...

कर्नाटकमधील सत्ताधारी काँग्रेस पक्ष केवळ, राहुल गांधी यांना खूश करण्यासाठी मतपत्रिकेवर निवडणुका घेत आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव स्पष्ट आहे, मग 'ईव्हीएम' असो वा बॅलेट पेपर, असा टोला भाजप प्रवक्ते प्रकाश एस. यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT