

Ahilyanagar municipal election result : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडून आला आहे. विशेष म्हणजे, छत्रपतींचा अवमान केल्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याने विजय मिळवला आहे.
श्रीपाद छिंदम याचा पूर्वी वार्ड क्रमांक नऊ होता. यावेळी प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली. यात अनेकांचे वार्ड आडवे-तिडवे फुटले गेले. तसा छिंदम याचाही वार्ड फुटला. त्यामुळे छिंदमने प्रभाग दहामधून बहुजन समाजवादी पक्षाच्या चिन्हावर निवडून लढली अन् तो विजयी देखील झाला.
श्रीपाद छिंदम याच्या विरोधात भाजपचे महेंद्र बोज्जा, 'AIMIM'चा शाहिस्त तनवीर पठाण, अपक्ष अजयकुमार लयचेट्टी हे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. श्रीपाद छिंदम याने बसपाचं (BSP) चिन्हावर निवडणूक लढवत, तब्बल 8 हजार 258 एवढी मतं मिळवली. या विजयानंतर, शिवद्रोही हा शिक्का लागलेला श्रीपाद छिंदम निवडणुकीत जिंकतोच कसा? अशी चर्चा सुरू आहे.
श्रीपाद छिंदम हा पद्मशाली समाजाचा नेता आहे. अहिल्यानगर शहरात पद्मशाली समाजाची 15 हजारांपेक्षा जास्त मतं आहेत. हीच मतांची ताकद पद्मशाली समाजाच्या नेत्याबरोबर कायम राहत असल्याचं निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक विधान केलं होतं, त्यावेळी तो भाजपकडून (BJP) उपमहापौर पदावर होता.
श्रीपाद छिंदम याने 16 फेब्रुवारी 2018 रोजी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याशी मोबाइलवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. यानंतर भाजपने छिंदमची पक्षातून हकालपट्टी करत त्याच्याकडून उपमहापौरपदाचाही राजीनामाही घेतला होता.
याप्रकरणी श्रीपाद छिंदमला अटक देखील करण्यात आली होती. छिंदम याच्यावर सरकारी कामात अडथळा आणि धार्मिक भावना दुखवल्याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. पुढे छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरूषांना अभिवादन करत, माफी मागितली.
यानंतर श्रीपाद छिंदम वर्षअखेर डिसेंबर 2018 मध्ये महापालिकेच्या निवडणुकीला समोरं गेला. यावेळी छिंदम हा प्रभाग नऊमधून उभा होता. त्यावेळी तो विजयी झाला. दरम्यान, ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, यावेळी श्रीपाद छिंदम हा अपक्ष म्हणून निवडणुकीला उभा राहिला. यात त्याची अनामत रक्कम देखील जप्त झाली.
दरम्यान, श्रीपाद छिंदम याने 2018च्या निवडणुकीत 'ईव्हीएम' मशीनची पुजा केली होती. त्याचाही व्हिडिओ, छायाचित्र समाज माध्यमांवर येताच, त्याच्याविरोधात सरकार कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. विशेष म्हणजे, या निवडणुकीत श्रीपाद छिंदम याच्यावर हद्दपारीची कारवाई झाली होती. तरी देखील श्रीपाद छिंदम हा निवडून आला.
राज्यात ठाकरेंचं सरकार होते. नगर विकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. राज्य सरकारने राष्ट्रपुरूषांचा अवमान केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द केलं होतं. श्रीपाद छिंदम याने या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई लढत होता. आता पुन्हा, 2026 मध्ये महापालिका निवडणुकीला समोरे गेला.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत दिग्गज माजी नगरसेवकांना पराभवाला समोरं जावं लागला. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, एकनाथ शिंदे शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. असे असताना, शिवद्रोहीचा शिक्का पडलेला असताना, श्रीपाद छिंदम हा निवडणूक कसा जिंकतो, याचा प्रश्न अनेकांना पडला आहे.
यावर काही जाणकारांनी आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया देताना, म्हटले की, "त्याचा समाज त्याच्या मागे उभा आहे. श्रीपाद छिंदम याला त्याच्या समाजाकडून समर्थन मिळते आहे. याच समाजाच्या एका माजी नगरसेवकाविरोधात, त्यांच्याच समाजाने आंदोलन केलं होतं. परंतु निवडणुकीवेळी एक होत, त्याला पुन्हा निवडून आणलं. हा धडा मराठी मतदारांनी घेतला पाहिजे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.