Sonia Gandhi News, Congress News, Latest Political News Updates
Sonia Gandhi News, Congress News, Latest Political News Updates sarkarnama
देश

Karnataka Election 2023 : एका शब्दामुळे सोनिया गांधी अडचणीत ;BJP ची निवडणूक आयोगाकडे तक्रार ; त्या म्हणाल्या..

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा प्रचार संपण्यास काही तास शिल्लक आहे. काँग्रेसच्या नेत्या, माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची काल (रविवारी) हुबळी येथे सभा होती. या सभेत त्यांनी केलेल्या एका विधानामुळे त्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्याविरोधात भाजप नेते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत. (bjp complains against sonia gandhi in election commission)

हुबळी येथील सभेतील भाषणात त्यांनी 'कर्नाटकचं सार्वभौमत्व' हा शब्द वापरला आहे. त्यामुळे राजकारण पेटलं आहे, भाजप नेत्यांनी त्यांच्या या शब्दावर आक्षेप घेतला आहे.

निवडणूक आयोगाकडे भाजप तक्रार करणार आहे. दिल्लीतील भाजपच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, "सोनिया गांधी यांनी जाणुनबूजून अशा शब्दांचा उपयोग केला आहे. त्यांच्याविरोधात निवडणूक आयोग कारवाई करणार आहे,"

'कर्नाटकचं सार्वभौमत्व'असा उल्लेख करीत सोनिया गांधींनी कर्नाटकला देशापासून तोडण्याचा प्रयत्न केला आहे. सोनिया गांधी यांच्या त्या सभेच्या फोटो काँग्रेसने टि्वट करीत "कर्नाटकचं सार्वभौमत्व, प्रतिष्ठा, आणि अखंडतेला काँग्रेस कुठल्याही प्रकारचा धोका होऊ देणार नाही," असे काँग्रेसने म्हटलं आहे. यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज (सोमवार) संपणार आहे. बुधवारी (ता.१०) मतदान होणार आहे. कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात धार्मिक ध्रुवीकरणावरच भर दिला जात आहे. राम, हनुमान, टिपू सुलतान, विविध मठ असे मतदारांना भावतील असे मुद्दे प्रचारात मांडले जात आहेत.

भाजप, काँग्रेस, जेडीएस अशी तिहेरी लढत आहे. पक्षाच्या स्टार प्रचारकांनी गेल्या पंधरा दिवसात प्रचाराचा धुराळा उडवला आहे. भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे, काँग्रेसने स्थानिक मुद्यांवरुन भाजपला कोंडीत पकडले आहे. तर जेडीएस नेहमीप्रमाणे 'किंग मेकर'च्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नशिब अजमावण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT