Smriti Irani , Karnataka Election
Smriti Irani , Karnataka Election Sarkarnama
देश

Karnataka Election : राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पडायची वेळ आलीयं..,काँग्रेसचा हात थांबलायं ; स्मृती ईराणींचा घणाघात

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Election 2023) प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.

भाजपच्या नेत्या, महिला व बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांची निपाणी येथे सभा झाली. मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

विद्या संवर्धक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या सभेत व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री अन्नपूर्णेश्वरी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, भाजप निरीक्षक अजित गोपच्यागोळ, शांभवी अनंतपूर, हालशुगरचे चेअरमन चंद्रकांत कोठीवाले, नगराध्यक्ष जयवंत भाटले आदी उपस्थित होते.

स्मृती ईराणी म्हणाल्या, "भाजपने रामनाथ कोविंद व द्रौपदी मुर्मू या दलित व आदिवासी नेत्यांना राष्ट्रपती केले. त्यांना साधा नमस्कार राहुल गांधी व सोनिया गांधी यांनी केलेला नाही. गरीब, शोषित व वंचिताची भाषा त्यांना शोभत नाही. भाजपने कर्नाटकात मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण रद्द करून गरीब वक्कलिंग समाजाला दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी विरोधक आटापिटा करत आहेत. ते शक्य नाही. शिवाय मंत्री शशिकला जोल्ले विरोधकांना भारी पडल्या आहेत,"

"काँग्रेसच्या प्रचारासाठी सिद्धरामय्या येत आहेत. या सर्वांना शशिकला जोल्ले यांची ताकद दाखवून द्या. राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडायची वेळ आली आहे. काँग्रेसचा हात जिथे आहे तेथे थांबला आहे. मोदींनी देशातील नागरिकांना कोरोना काळात मोफत लसीकरण केले. मोफत रेशन वाटप केले. शेतकर्‍यांना वार्षिक 10 हजारांचे अनुदान दिले," असे स्मृती ईराणी म्हणाल्या.

राष्ट्रवादीनं आपलं घर सांभाळावे..

कर्नाटक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उतरली आहे, यावर ईराणी यांनी टीका केली. त्या म्हणाल्या, "कर्नाटकातील निवडणूक रिंगणात आता बंद पडलेले घड्याळ उतरले आहे. जोल्ले यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी जयंत पाटील आले होते. तर शरद पवार ही येणार असल्याचे समजते.पण निपाणीच्या माहेरवाशीण असणाऱ्या शशिकला जोल्ले या निपाणी मतदार संघ सांभाळण्यासाठी सक्षम आहेत. तुम्हाला सोडून लोक चालले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने अगोदर आपलं घर सांभाळावे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT