Barsu Refinery Project News : विनायक राऊतांची गाडी पोलिसांनी अडवली..; बारसू येथे आंदोलक आक्रमक

Vinayak Raut at Barsu Refinery Project: आम्हा जनतेच्या पाठिशी आहोत, असे राऊत म्हणाले.
Protest against Barsu Refinery
Protest against Barsu RefinerySarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News: बारसू सोलगाव (जि. रत्नागिरी) येथील प्रस्तावित रिफायनरीवरुन राजकारण पेटलं आहे. स्थानिक नागरिकांना या प्रकल्पाला विरोध केला आहे. तर सत्ताधारी शिंदे-भाजप सरकारने या ठिकाणी माती परीक्षणास सुरवात केली आहे. याला विरोध करण्यासाठी दोन दिवसापासून स्थानिकांनी आंदोलन सुरु केली आहे, महिला आंदोलक रस्त्यावर उतरल्या आहेत.

पोलिसांनी आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना अटक केली आहे. तर काही ग्रामस्थांना ताब्यात घेतले आहे. आता पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत.

खासदार विनायक राऊत यांच्या बारसू दौऱ्याच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना नोटीसा बजवण्यात आल्या आहेत. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना नोटीस बजवण्यात आली आहे. तुमच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये कायदा सुव्यवस्था बिघडल्यास आपणावर कारवाई होईल, असे बजावण्यात आले आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे ही नोटीस देण्यात आली आहे.

Protest against Barsu Refinery
Sharad Pawar News : बारसू रिफायनरी बाबत सामंतांच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले, " आंदोलकांच्या भावना..."

आज (बुधवारी) खासदार विनायक राऊत हे आंदोलकांना भेटण्यासाठी बारसू येथे आंदोलकांना भेटण्यासाठी जात असताना त्यांची गाडी पोलिसांनी अडवली. त्यांच्यासोबत आमदार वैभव राऊत होते. बारसूला जाताना रानतळे चेकपोस्टवर पोलिसांनी त्यांची गाडी अडवली होती. 'पोलिसांच्या या नोटिशा आम्ही किमंत देत नाही, आम्हा जनतेच्या पाठिशी आहोत, असे राऊत म्हणाले.

या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी विरोध करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी दोन दिवसापासून सर्व्हेक्षण सुरु झालं आहे.पण या सर्व्हेक्षणाला काही स्थानिकांनी विरोध केला आहे. काही महिला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. त्यानंतर या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलं. या प्रश्नाबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

Protest against Barsu Refinery
Barsu Refinery Project News : बारसू रिफायनरी मुद्यावरुन ठाकरे गटात मतभेद ; स्थानिक आमदाराचा पाठिंबा

सामंतांच्या भेटीनंतर पवारांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. शरद पवार म्हणाले, "बारसू येथील प्रकल्पाबाबचा आढावा उदय सामंतांनी दिला आहे. या प्रकल्पासाठी कुणाचीही जमिनी घेतलेली नाही, या ठिकाणी माती परीक्षण सुरु आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली आहे. स्थानिक आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन यावर तोडगा काढावा, अशी सूचना सामंत यांना केली होती. ही सूचना त्यांनी मान्य केली आहे. सामंत हे अधिकाऱ्यांसमवेत उद्या (गुरुवारी) आंदोलकांसोबत बैठक घेणार आहेत," (Latest Marathwada News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com