Sushma Swaraj
Sushma Swaraj sarkarnama
देश

Karnataka Political News : सुषमा यांच्या 'त्या' विधानाची चर्चा ; जनार्दन रेड्डींच्या एन्ट्रीमुळे नव्या समीकरणांची नांदी

सरकारनामा ब्युरो

Janardhana Reddy News : पुढील वर्षात कर्नाटकात विधान निवडणुका होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपला मोठा धक्का देत कर्नाटक सरकारमधील माजी मंत्री आणि खाण व्यावसायिक जी जनार्दन रेड्डी यांनी वेगळी चूल मांडत नवा पक्ष स्थापन केला आहे, यामुळे कर्नाटकातील राजकारणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. (karnataka Political News update)

जी जनार्दन रेड्डी यांनी कल्याण राज्य प्रगती पक्ष (KRPP) या नवीन पक्षाची स्थापना केली असून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. गेली दोन दशके रेड्डी हे भाजपमध्ये होते. भाजपचा राजीनामा देत त्यांनी धर्म, जात आणि फुटीरवादी राजकारणाविरोधात लढणार असल्याचे म्हटलं आहे.

त्यांचे दोन आमदार बंधू करुणाकर रेड्डी आणि सोमशेकर रेड्डी सध्या भाजपमध्ये आहेत. त्यांचे खास मित्र श्रीरामुलू हे देखील कर्नाटकातील भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत. जनार्दन रेड्डी हे तीन भावांपैकी सर्वात मजबूत आहेत. व्यवसायाचे प्रमुख देखील तेच आहेत. रेड्डी बंधूंना कर्नाटकातील खाण व्यवसायाचे राजे म्हटले जाते.

जनार्दन रेड्डी यांनी कर्नाटकाच्या राजकारणात नवी चुल मांडली आहे, त्यानंतर आता भाजपच्या नेत्या, माजी मंत्री सुषमा स्वराज( Sushma Swaraj) यांच्या एका विधानाची सध्या चर्चा होत आहे.

सुषमा स्वराज यांनी १९९९ मध्ये बेल्लारीमधून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला होता. यावेळी त्यांची रेड्डी बंधुंशी ओळख झाली होती. त्यानंतर त्या दहा वर्ष बेल्लारी येथे वारा महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी येत होत्या.

रेड्डी बंधु हे त्यांना आई म्हणायचे. कर्नाटकात लोकायुक्त असलेले न्यायमूर्ती संतोष हेगडे यांची एंट्री झाल्यानंतर रेड्डी बंधूंच्या व्यावसायिकाला उतरती कळा लागली.

हेगडे यांनी बेकायदा खाणकामाबाबत अहवाल दिला. यात रेड्डी बंधूंच्या खाणकामावर विविध आरोप केले. त्यानंतर सुषमा स्वराज यांनी २०११ मध्ये रेड्डी बंधूंना एक मेसेज पाठवला होता. यात सुषमा यांनी त्यांना 'त्या आता त्यांच्या 'आई' राहिल्या नाहीत,' असा मेसेज पाठवला होता. या मेसेजची चर्चा सध्या होत आहेत.

अवैध खाण प्रकरणात जनार्दन रेड्डी हे कारागृहात गेले होते. त्यानंतर भाजपने 2018 पासून त्यांच्याशी संपर्क केला नव्हता. अमित शाह त्यांच्यावर विशेष नाराज असल्याचे सांगण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT