Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज (बुधवारी) मतदान होत आहे. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 224 जागांसाठी मतदानास आज सुरवात झाली आहे. यासाठी निवडणूक आयोगाची कडक सुरक्षा यंत्रणा ठेवली आहे. दरम्यान, या मतदानाच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक गोष्ट आता समोर आली आहे.
समाज माध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. व्हिडीओमधील दाव्यानुसारकर्नाटकामध्ये आज एका भाजप नेत्याच्या गाडीत एव्हीएम मशीन सापडल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिकस लोकांनी या वाहनात असलेल्या ईव्हिएम मशीनला पकडले आहे. यामुळे येथे लोकांमध्ये प्रचंड उद्रेक दिसून आला. यावेळी रस्त्यावर लोकांनी रोष व्यक्त केला. वाहनातील इव्हीएम मशीन काढून तोडफोड केली, अशा आशयाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
यावेळी या ठिकाणी जमलेल्या जनतेने तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी भाजपविरूद्ध जोरदार घोषणा दिल्या. जनता आता जागरूक झालेली आहे. अशा प्रकारामुळे भाजपची आता काही खैर नसल्याचे य़ेथे जमलेल्या लोकांनी म्हंटले आहे. यामुळे आता पुन्हा ईव्हीएमबाबत (EVM) चर्चा होत आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ कर्नाटकातील कोणत्या भागातला आहे, याची पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, हा व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत लोक भाजपविरोधी घोषणा देताना दिसत आहेत. (Karnatka Election)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.