Karnataka Polls 2023 LIVE : गॅस सिलेंडरला नमस्कार करुनच मतदान करा ; मोदींच्या विधानाची काँग्रेसने करुन दिली आठवण..

congress Attack on PM Narendra Modi : मोदींच्या आवाहानानुसारच मतदान करा..
Karnataka Polls 2023 LIVE
Karnataka Polls 2023 LIVESarkarnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 224 जागांसाठी मतदानास आज सुरवात झाली आहे. यासाठी निवडणूक आयोगाची कडक सुरक्षा यंत्रणा ठेवली आहे. विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशिवाय माजी मुखयमंत्री सिद्धारमैया, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार, जेडीएसचे प्रमुख एचडी कुमारस्वामी यांच्यासह अनेक मोठे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मतदान करण्यापूर्वी रामनगर येथील कनकपुऱ्यात श्री केनकेरम्मा मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. डीके शिवकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली.

ते म्हणाले, "गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना आवाहन केले होते की मतदान करण्यापूर्वी आपल्या गॅस सिलेंडरकडे पाहावे, त्याला नमस्कार करावा, त्यानंतर मतदान करावे. त्यानुसार या निवडणुकीतही मोदींच्या आवाहानानुसारच मतदान करा,"

Karnataka Polls 2023 LIVE
Karnataka Assembly Elections 2023 : लग्नाच्या मंडपात पोहचण्याआधी ती गेली थेट मतदान केंद्रात.. ; नारायण मूर्ती, प्रकाश राज यांनी..

"मोदींच्या सल्लानुसार, या निवडणुकीतही मतदान करण्यापूर्वी मतदारांनी गॅस सिलेंडरची किंमत पाहावी. सत्ता परिवर्तनाची मतदारांना आज मोठी संधी आहे. कर्नाटकाच्या विकासासाठी मतदान करा, सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेसला मतदान करा," असे डीके शिवकुमार म्हणाले.

Karnataka Polls 2023 LIVE
Karnataka Election News: निवडणूक आयोगाने तोडले रेकॉर्ड ; कोट्यवधी रुपयांच्या वस्तू जप्त, कर्नाटकात आज मतदान

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचे सुपुत्र बीवाय विजयेंद्र (b y vijayendra) यांनी वडीलांसोबत मतदानाचा हक्क बजावला, त्यानंतर ते म्हणाले, "या निवडणूक भाजप बहुमताने सत्तेत येईल. लिंगायत समाजासह अन्य जाती-समाज भाजपसोबत आहे. काँग्रेसचा या निवडणुकीत वाईट पराभव होणार आहे," "मोदी मैजिक चल रहा है.." असे विजयेंद्र म्हणाले. बीएस येदियुरप्पा मतदानानंतर म्हणाले, "भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत येणार आहे. मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे,"

शिकारीपुरा विधानसभा मतदार संघातून विजयेंद्र निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचा वडीलांचा हा पारंपारिक मतदारसंघ आहे. "ही माझी पहिली निवडणूक आहे. निवडणूक लढण्यास पक्षाने मला संधी दिली, याचा मला आनंद आहे. शिकारीपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मला आनंद आहे, "

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com