Karnataka Assembly Election Result 2023 :  Sarkarnama
देश

Karnataka Election : सर्वात श्रीमंत असणाऱ्या अब्जाधीश उमेदवारांची कशी राहिली कामगिरी?

Karnataka Assembly Election Result 2023 : काही विजयी तर काही पराभूत!

Chetan Zadpe

Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटकात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप विरोधात लाटेमुळे काँग्रेस बहुमतापेक्षा अधिकचं यश मिळालं. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर काही उमेदवारांची संपत्ती कर्नाटक राज्यात चर्चेचा विषय बनली होती. निवडणुकीच्या रिंगणातील सर्वात श्रीमंत सहा उमेदवारांनी निवडणुकीत कशी कामगिरी केली याचा एक आढावा.

युसूफ शरीफ (अपक्ष) :

बेंगळुरू जिल्ह्यातील चिकपेट येथील अपक्ष उमेदवार युसूफ शरीफ यांची सपत्ती तब्बबल 1,633 कोटी रुपये इतकी आहे. ते कर्नाटकातील सर्वात श्रीमंत उमेदवार होते. मात्र ते या निवडणुकीत पराभूत झाले. या मतदारसघातून भाजपचे उमेदवार उदय गरूडचार निवडून आले. उदय गरूडचार यांना 57299 मते मिळाली. तर इथे काँग्रेस आमदार आर व्ही देव्हराज यांना 45186 मते मिळाली. युसूफ शरीफ यांना 20931 मते मिळाली. एकूण मतदानाच्या 16 टक्के मते त्यांना मिळाली.

एन नागराजू उर्फ एमटीबी नागराजू (भाजप) :

एन नागराजू उर्फ एमटीबी नागराजू, बेंगळुरू ग्रामीणमधील होसाकोटे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आहेत. 1609 कोटी त्यांची संपत्ती आहे. ते दुसऱ्या क्रमाकाचे सर्वात श्रीमंत उमेदवार होते. मात्र ते या निवडणुकीत पराभूत झाले. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सारथ कुमार बचेगौडा यांनी विजय मिळवला. बचेगौडा यांना 107220 मते मिळाली तर नागराजू यांना 102145 मते मिळाली. पाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला.

डीके शिवकुमार (काँग्रेस) :

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी (KPCC) प्रमुख व दिग्गज नेते डीके शिवकुमार कनकापुरा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते, 1,413 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह राज्यातील तिसरे सर्वात श्रीमंत उमेदवार होते. त्यांनी त्यांचे भाजप प्रतिस्पर्धी आर अशोक यांच्यावर मोठा विजय मिळवला. शिवकुमार यांना 1,42,156 मते मिळाली. जी एकूण मतांच्या 75 टक्के एवढी होती.

प्रियकृष्ण (काँग्रेस) :

गोविंदराजनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे आणखी एक उमेदवार प्रियकृष्ण यांच्याकडे 1,156 कोटी रुपयांची संपत्ती होती, ज्यामुळे ते चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार म्हणून चर्चा होती. प्रियकृष्ण यांना 82134 इतकी मते मिळवत विजय नोंदवला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार उमेश शेट्टी यांचा पराभव झाला.

सुरेशा बीएस उर्फ बिराथी सुरेश (काँग्रेस) :

काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे हेब्बल मतदारसंघाचे उमेदवार सुरेशा बीएस उर्फ बिराथी सुरेश हे 648 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार होते. त्यांनी 91838 मतांसह त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार के एस जगदीशा कट्टा यांचा पराभव केला.

एन ए हरीस (काँग्रेस) :

शांतीनगर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार एन ए हरीस यांचीसंपत्ती 439 कोटीपेक्षा अधिक आहे. त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. हरीस यांनी भाजपचे उमेदवार एच शिवकुमार यांचा पराभव केला. हरिस यांना 61030 मते मिळाली. तर एच शिवकुमार यांना 53717 मते मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT