Karnataka Politics : देशातील सर्वात श्रीमंत आमदार कर्नाटकात ; २१० कोट्याधीश विधानसभेत..

Karnataka Election Result 2023 : २२४ आमदारांची एकूण संपत्ती १० हजार ८३४ कोटी रुपये आहे.
Karnataka Election 2023:
Karnataka Election 2023: Sarkarnama

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसने बहुमत मिळवले आहे. लवकरच मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर होणार आहे. या वेळी विधानसभेत पोहचलेले बहुसंख्य आमदार हे कोट्याधीश आहेत. (karnataka Politics 210 millionaire mlas arrived in karnataka assembly)

Myneta.info या संकेतस्थळांनुसार, यंदा निवडून आलेले २२४ आमदारांची एकूण संपत्ती १० हजार ८३४ कोटी रुपये आहे. यात भाजप, काँग्रेस, जेडीएसच्या आमदारांचा समावेश आहे.

कर्नाटकात सर्वात श्रीमंत आमदार एच.के. पुत्तास्वामी गौंडा हे ठरले आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. आपल्या निवडणूक अर्जात त्यांची संपत्ती १,२६२ कोटी असल्याची नोंद आहे. तर दुसऱ्या स्थानावर आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार.त्यांची संपत्ती १,१४९ कोटी रुपये आहे.

तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे आमदार सुरेश बीएस हे आहेत त्यांच्याकडे ५०० कोटींची संपत्ती आहे. भाजपचे सर्वात श्रीमंत आमदार एचके सुरेश आहेत. त्यांच्याकडे ४२३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर जेडीएसचे आमदार एम.आर.मंजूनाथ यांच्याकडे २५५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Karnataka Election 2023:
Mallikarjun Kharge Summoned : 'बजरंगबली'मुळे मल्लिकार्जुन खर्गे संकटात ; प्रचारातील विधान अंगलट आलं..

संपत्तीचा विचार केला तर डी.के. शिवकुमार हे पहिल्या क्रमांकावर आहेत, त्यांची एकूण संपत्ती १,४१३ कोटी रुपये आहे. मात्र, त्यांच्यावर २६५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे ते एकूण संपत्तीमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

Karnataka Election 2023:
Maharashtra Politics : शिंदे-फडणवीसांमध्ये श्रेयवादावरुन लढाई ; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर फडणवीसाचं टि्वट.. म्हणाले...'

महाराष्ट्रातील आमदार दुसऱ्या क्रमांकावर..

कर्नाटक विधानसभेत देशातील सर्वात श्रीमंत आमदार बसतात. एका मीडिया रिपोर्टच्या नुसार कर्नाटकातील एका आमदाराकडे सरासरी ३४.६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ती अन्य राज्यातील आमदारांपेक्षा जास्त आहे. दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशाचे आमदार आहेत त्यांची सरासरी संपत्ती २७.९ कोटी रुपये आहे. तर त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील आमदाराकडे सरासरी २२.४ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Karnataka Election 2023:
Karnataka Election Result 2023 : नावात काय आहे ? ; नामसाधर्म्यामुळं काँग्रेसचा केवळ सोळा मतांनी पराभव..; भाजपची खेळी ?

कर्नाटकाचा मुख्यमंत्री कोण?

कर्नाटकात काँग्रेसने एक हाती सत्ता स्थापन केलेली आहे. पण कर्नाटकाचा मुख्यमंत्री कोण? याबाबत अद्यापही कोणता निर्णय झालेला नाही. पण लवकरच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे याबाबतची घोषणा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com