Karnataka Election Result : Shafi saadi
Karnataka Election Result : Shafi saadi Sarkarnama
देश

Karnataka Election Result : मुस्लिमांना उपमुख्यमंत्रीसह पाच मंत्रिपदे मिळावीत; वक्फ बोर्ड अध्यक्ष शफी सादींची मागणी!

सरकारनामा ब्यूरों

Karnataka Assembly Elections Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल झाले. काँग्रेसने (Congress News) 135 जागा दमदार विजय मिळवला आहे. दुसरीकडे भाजप (BJP) आणि जेडीएस (JDS) या दोन्ही पक्षांच्या जागा कमी झाल्या आहेत. (Muslims should get five minister posts including Deputy Chief Minister)

दरम्यान,कर्नाटक निवडणुकीत ८८ टक्के मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला मतदान केले. आमच्या समाजामुळे बहुमत काँग्रेसकडे आले असून, आमच्या समाजासाठी उपमुख्यमंत्रिपद व पाच मंत्रिपदे द्यावीत, अशी मागणी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शफी सादी यांनी केली आहे.

राज्यातील मुस्लिमांपैकी ८८ टक्के मुस्लिमांनी काँग्रेसला मतदान केले. काँग्रेस पक्षाला मतदान करण्यासाठी आम्ही सर्व मशिदींमध्ये प्रचार आणि जनजागृती केली, असे सांगून सादी म्हणाले, "राज्यात काँग्रेसच्या ७३ आमदार जिंकून देण्यात मुस्लिमांचा महत्त्वाचा वाटा आहे."

कर्नाटकातील सर्व २२४ मतदारसंघांपैकी १५ मतदारसंघांमध्ये मुस्लिमांनी निवडणूक लढवली. त्यापैकी ९ जण विजयी झाले. यापूर्वी एस. एम. कृष्णा मुख्यमंत्री असताना मुस्लिम समाजातून निवडून आलेल्या पाच आमदारांना सरकारमध्ये मंत्रिपदे देण्यात आली होती.

त्यामुळे आता नव्याने अस्तित्वात येणाऱ्या काँग्रेस सरकारमध्येही पाच मंत्रिपदे आणि उपमुख्यमंत्रिपद द्यायला हवे. मुस्लिमांच्या पाठिंब्यामुळे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले, असा त्यांनी दावा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT