Karnataka Assembly Election Result 2023 : Rahul Gandhi  Sarkarnama
देश

Karnataka Election Result : "राहुल गांधींच्या 'भारत जोडो' चा करिश्मा; ज्या ज्या ठिकाणी यात्रा, तिथे काँग्रेस..."

Karnataka Assembly Election Result 2023 : भारत जोडो यात्रा ठिकाणाच्या तब्बल ६३ टक्के जागी काँग्रेस विजयी

Chetan Zadpe

Karnataka Assembly Election Result 2023 : काँग्रेसचे नेते आणि माजी संसद सदस्य राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या कन्याकुमारी ते कश्मिर या साडेतीन हजार किलोमीटरच्या भारत जोडो (Bharat Jodo Rally) यात्रेचा परिणाम कर्नाटक राज्यातील निवडणुकीत दिसून आल्याची चर्चा आहे. (Rahul Gandhi News)

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे कल येत आहेत. या ताज्या निकालांच्या कलानुसार कर्नाटक राज्यात काँग्रेस पक्षाने जोरदार पुनरागमन केले आहे. कर्नाटकच्या कानडी जनतेने भाजपला सपशेल नाकारले आहे. तर काँग्रेसला पुर्ण बहुमतात सरकार बनवण्याची संधी दिली आहे. ताज्या कलांनुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतमोजणी सुरू असून, सुरुवातीपासून आतापर्यंत निकालांच्या कलामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra) या दरम्यान चर्चा होत आहे. राहुल गांधींनी कर्नाटकात ज्या मतदारसंघातून भारत जोडो यात्रा केली, तेथील बहुतांश जागांवर काँग्रेसची कामगिरी चांगली होताना दिसत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कर्नाटकातील 224 विधानसभा मतदासंघापैकी 51 मतदारसंघातून प्रवास केला होता. या 51 मतदारसंघापैकी 32 मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मतांची आघाडी घेतली असून, त्यांनी विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे.भारत जोडो यात्रेचा ज्या मतदारसंघातून प्रवास झाला होता, त्यापैकी 63 टक्के जागांवर भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा होताना दिसत आहे.

21 दिवस कर्नाटकमध्ये भारत जोडो यात्रा :

राहुल गांधींनी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा सुरू केली आणि 3 महिन्यांत सुमारे 4000 किलोमीटरचा प्रवास करून काश्मीरला पोहचले. या यात्रेतील राहुल गांधी यांनी 21 दिवस कर्नाटक राज्याला दिले. 30 एप्रिल ते 19 ऑक्टोबर असा भारत जोडोचा कर्नाटक प्रवास होता. यादरम्यान भारत जोडो यात्रा दररोज सुमारे 25 किलोमीटरची यात्रा करून, एकूण 511 किलोमीटरच अंतर चालले.

कर्नाटकात काँग्रेस 137 जागांवर आघाडीवर :

कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 च्या मतमोजणीच्या सुरूवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून, आतापर्यंत काँग्रेस 137 जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला चांगलाच फटका बसला असून, भाजप 65 जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर जेडीएसने 19 जागांवर सुरुवातीची आघाडी घेतली आहे. 10 मे रोजी कर्नाटकात 224 जागांसाठी मतदान झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT