Nikhil Kumaraswamy, Iqbal Hussain HA
Nikhil Kumaraswamy, Iqbal Hussain HASarkarnama

Karnataka Election Result : आजारी असतानाही माजी पंतप्रधानांनी प्रचार केला; तरीही नातवाचा पराभव झाला !

H. D. Deve Gowda : काँग्रेसचे इक्बाल हुसैन यांचा दणदणीत विजय

Karnataka VidhanSabha Election Result : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि जेडीएस हे तीन पक्ष ताकदीने उतरले होते. या निवडणुकीत काँग्रेसची सरशी झाली आहे. दुसऱ्या स्थानावरील भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तर तिसऱ्या स्थानावरील माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या जेडीएस पक्षाला फक्त २० जागांवर समाधान लागले आहे. धक्कादायक म्हणजे या निवडणुकीत देवेगौडा यांच्या नातवाला पराभव स्वीकारावा लागला आहे. (NIKHIL KUMARASWAMY)

Nikhil Kumaraswamy, Iqbal Hussain HA
Karnataka Election Result : बजरंग बली भाजपाच्या मदतीला का नाही आले ?

रामनगरम मतदारसंघातून माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू, तथा माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा मुलगा निखील कुमारस्वामी यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार एच.ए. इक्बाल हुसैन विजयी झाले आहेत. हुसैन यांना ८७ हजार ६९० मते मिळाली आहेत. त्यांनी ४८ टक्के मते घेतली. तर दुसऱ्या स्थानावर गेलेले निखील कुमारस्वामी यांना ७६ हजार ९७५ मते मिळाली आहेत. त्यांनी ४२ टक्के मते घेतली. तर भाजपच्या गौतम मारीलिंगेगौडा यांना फक्त १२ हजार ९१२ मते मिळाली आहे. (Janata Dal (Secular))

Nikhil Kumaraswamy, Iqbal Hussain HA
Karnataka Election Results : साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणून फडणवीसांनी हिणवलेल्या निपाणीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव !

आजारपणामुळे जेडीएसचे नेते माजी मुख्य कुमारस्वामी शेवटच्या टप्प्यात प्रचारापासून दूर राहिले होते. त्यावेळी नव्वदीत असलेले माजी पंतप्रधान ए.डी. देवेगौडा यांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यांना चालतानाही त्रास होत होता. प्रचारादरम्यान त्यांनी आठवड्यातून एक दिवस इंजेक्शन घेण्यासाठी सुटी घेतली. त्यांनी ४८ मतदारसंघात प्रचाराची राळ उठविली. त्यांच्या परिश्रमाला मात्र यश येताना दिसत नाही.

Nikhil Kumaraswamy, Iqbal Hussain HA
Karnataka election result : बजरंगबलीच्या घोषणा देत काँग्रेसचा विजयोत्सव!

कर्नाटकमधील २२४ जागांपैकी काँग्रेसने २२३, भाजपने सर्व २२४ तर जेडीएसने २०९ जागांवर उमेदवार दिले होते. या तिरंगी निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. सध्या काँग्रेसने १३६ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप ६४ जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएसला २० जागा मिळतील, असे चित्र आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला एकही जागा मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेस एकहाती सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com