Yogi Adityanath
Yogi Adityanath Sarkarnama
देश

Karnataka Election 2023: धर्माच्या आधारित आरक्षण देणं संविधानाच्या विरोधात : योगी आदित्यनाथ

सरकारनामा ब्यूरो

Reservation based on religion is wrong yogi: कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दहा मे रोजी मतदान होणार आहे. सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. पक्षाचे स्टार प्रचारक कर्नाटकात तळ ठोकून आहेत.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) भाजपचे (BJP) कर्नाटकमधले स्टार प्रचारक आहे. बुधावारी त्यांनी कर्नाटकमधल्या मांड्या इथं प्रचार सभेला संबोधित केलं. योगींनी मांड्यात रॅली काढली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते.

योगी आदित्यनाथ म्हणाले, "धर्माच्या आधारित आरक्षण भारतीय संविधानाच्या विरोधात आणि असंविधानिक आहे. देश आणखी एका फाळणीला तयार नाही, भाजप पीएफआयला बंदी घालते तर दुसरीकडे काँग्रेस तुष्टीकरणाचे काम करते."

योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवरही हल्लाबोल केला. "काँग्रेस ज्या योजनांची घोषणा करतात त्या योजना कार्यकाळ पूर्ण होत आल्यानंतरही सुरुवात होत नाहीत. काँग्रेसला फक्त सत्ता उपभोगायची आहे, पण विकास करायचा नाही," असा टोमणा आदित्यनाथांनी लगावला.

यावेळी त्यांनी कर्नाटक आणि उत्तरप्रदेशचं जुन्या नात्याविषयी सांगितले. योगी म्हणाले, " कर्नाटक आणि उत्तरप्रदेशचं त्रेतायुगाचं नातं आहे. भगवान श्रीरामाचा जन्म उत्तरप्रदेशात झाला तर रामाला प्रिय असलेल्या हनुमानचा जन्म कर्नाटकात झाला. म्हणूनच आपलं नातं भगवान राम आणि हनुमानाइतकंच घट्ट आहे. मांड्याचा हाच गौरव आपल्या पुर्नप्रस्थापित करायचा आहे,"

"उत्तरप्रदेशमध्ये रामाचं भव्य मंदिर उभारलं जात आहे. 2024 मध्ये या भव्य मंदिराचं उद्घाटन होणार आहे. रामाचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी त्यांचं भव्यदिव्य मंदिर उभं राहात आहे. मी तुम्हा सर्व हनुमानभक्तांना आमंत्रित करण्यासाठी आलोय," असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं. आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यावर नाशिकच्या साधुमहंतांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT