Raj Thackeray on Sharad Pawar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (बुधवारी) मुलाखत झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी ही मुलाखत घेतली.
राज ठाकरेंनी मिश्किलपणे काही प्रश्नांना दिलेल्या उत्तरांमुळे सभागृहात हशा पिकला. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भूमिका मांडली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली आहे.
या मुलाखती दरम्यान रॅपिड फायरच्या सत्रात त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी आवडते मुख्यमंत्री कोण ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
“एकनाथ शिंदे हे आताच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना मुख्यमंत्री म्हणून ठसा उमटवायचा आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावशाली मुख्यमंत्री म्हणून मी पाहिले असतील तर ते दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. देवेंद्र फडणवीस आहेत. मी पाहिल्यांपैकी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. मनोहर जोशी यांनी तो आब राखला. पण कामाचा झपाटा नारायण राणे यांच्याकडे बघितला, ”, असे निरीक्षण राज ठाकरे यांनी मांडलं.
अनेक गोष्टी वर्षानुवर्षे तुंबलेल्या आहेत..
राज ठाकरेंना राज्यातील राजकीय नेत्यांवर ईडी, सीबीआयकडून सुरू असलेल्या छापेमारीबाबत अमोल कोल्हे यांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, “अनेक ठिकाणी तपास यंत्रणा चुकीच्या राबवल्या जात आहेत यामध्ये दुमत असण्याचे काही कारण नाही. पण अनेक ठिकाणी तपास यंत्रणा या खऱ्याही राबवल्या जात आहे. अनेक गोष्टी वर्षानुवर्षे तुंबलेल्या आहेत. ते नाले साफ करणे गरजेचे आहे. कुणीतरी एकाने गोष्ट करून ठेवायाची आणि पुढचे दामदुपट्टीने जास्त जोरात करतात”
त्यांनी घरी पण थोड लक्ष दिलं पाहिजे..
"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सल्ला द्याल,? असा प्रश्न अम़़ता फडणवीस यांन राज ठाकरेंनी केला. यावर ठाकरेंनी 'वर (केंद्राकडे) नीट संबंध ठेवा," असा सल्ला दिला. यानंतर अम़ता यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक तक्रार केली.
"फडणवीस यांनी वर लक्ष दिलं पाहिजे, असे तुम्ही म्हणता, पण त्यांनी घरी पण थोड लक्ष दिलं पाहिजे, " असे अमृता म्हणाल्या.त्यावर राज ठाकरे म्हणाले, "मला तुमच्या घरच्या प्रश्नात आणू नका," असे राज ठाकरेंनी उत्तरं दिले
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.