Rahul Gandhi : Narendra Modi
Rahul Gandhi : Narendra Modi  Sarkarnama
देश

Karnataka Elections 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार? सी-व्होटरच्या सर्व्हेत भाजपला धक्का!

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Assembly Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. १० मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. यामुळे आता कर्नाटकमध्ये सत्तेवर असणाऱ्या भाजप (BJP) सत्ता राखण्यास भाजय यशस्वी होईल की, परिस्थितीत बदल होईल, याची सर्वांना उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर ABP आणि C-Voter संस्थेने निवडणुकपूर्व सर्व्हेचा अंदाज समोर आले आहे.

या सर्व्हेनुसार २२४ जागांच्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेस बाजी मारणार असल्याचे या सर्व्हेतून पुढे आले आहे. काँग्रेस ११५ ते १२७ जागा जिंकेल. तर सत्ताधारी भाजपची पीछेहाट होणार आहे. या निवडणुकीत बेरोजगारी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर पायाभूत सुविधा या मुद्यावर मतदान होणार, असे ही या सर्व्हेतून पुढे आले आहे .

या सर्व्हेनुसार कर्नाटकातील २२४ जागांपैकी काँग्रेसला ११५ ते १२७ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा हा आकडा बहुमताला पार करणारा आहे. तर भाजपला ६८ ते ८० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या जेडीएस पक्षाला २३ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT