Dattatray Bharane
Dattatray Bharane Sarkarnama

Dattatray Bharane On Girish Bapat's Demise : मैत्रीचे रत्न हरपले; गिरीश बापटांबाबत आमदार भरणेंनी सांगितल्या आठवणी

Pune : ''गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली''

Pune News : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजाराने आज (दि.29 मार्च) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या जाण्यानं राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याच्या भावना राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनीही त्यांच्याबाबत 'मैत्रीचे रत्न हरपले' अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.''गिरीश बापट हे राजकारणापलीकडचे व्यक्तिमत्व होते. मैत्रीचे रत्न होते. पुण्याच्या विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असून त्यांच्या निधनामुळे पुण्यामध्ये पोकळी निर्माण झाली आहे'', अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Dattatray Bharane
National Anthem Case : ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ? राष्ट्रगीताचा अवमान प्रकरणी मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका

आमदार दत्तात्रेय भरणे व बापट यांचे गेल्या १५ वर्षापासून राजकारणाच्या पलीकडील मैत्री होती. २०१४ ते २०१९ च्या दरम्यान राज्यामध्ये भाजप-सेनेचे सरकार होते. तेव्हा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट होते.

या पंचवार्षिकमध्ये भरणे विरोधी पक्षाचे इंदापूर तालुक्याचे आमदार होते. विरोधी पक्षाचे आमदार असतानाही भरणे यांनी इंदापूरसाठी १४०० कोटी रुपयांचा विकास निधी आणला होता. यामध्ये बापटांची महत्वाची भूमिका होती. त्यांनी इंदापूरसाठी निधी देताना दुजाभाव केला नाही, अशा आठवणी भरणे यांनी सांगितल्या.

Dattatray Bharane
Girish Bapat News : गिरीश बापट अनंतात विलीन; शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

''गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे आणि माझे पंधरा वर्षांपासून मैत्रीचे संबध होते. सुरवातीपासून आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षात काम करीत असलो, तरी त्यांनी पदावरती असताना किंवा नसताना कधीच दुजाभाव केला नाही. विकासकामांना महत्व देवून विकासाची कामे मार्गी लावली.

पुणे शहर, जिल्ह्याच्या तसेच इंदापूर तालुक्याच्या विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी पक्षविरहित काम केले. ते आभ्यासू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनामुळे राजकारण, समाजकारणामध्ये पोकळी निर्माण झाली आहे'', अशा आठवणी भरणे यांनी सांगितल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com